नागपूर : भोवळ येऊन ते खाली पडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात भरती केले. उपचाराला सुरुवात झाली. मात्र, मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांच्या पथकाने मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केले. त्या दुःखातही वडिलांनी काळजावर दगड ठेवून मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. या मानवतावादी पुढाकाराने तिघांना जीवनदान मिळाले. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे हे सलग तिसरे अवयवदान ठरले.
श्रीकांत पांडे, (४७) अवयवदात्याचे नाव. वर्धा येथील ते रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार श्रीकांत हे घरी असताना अचानक भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा येथे दाखल केले.
८८ किमी ग्रीन कॉरिडॉर पोलिसांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) वर्धा ते नागपूर असे जवळपास ८८ किलोटमीटरचे ग्रीन कॉरिडॉर करून काही मिनिटांत अवयव संबंधि रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तरुणांना अवयवदान या अवयवदानामुळे तिघांना आयुष्य मिळाले. ३७ वर्षीय पुरुषाला यकृत, ४० वर्षीय पुरुषाला एक मूत्रपिंड, २९ वर्षीय पुरुषाला दुसरे मूत्रपिंड दान करण्यात आले.