शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

मूलभूत विज्ञानातील नव्या ‘ट्रेन्ड्स’वर होणार मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 9:26 PM

शासकीय विज्ञान संस्था नागपूर आणि शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘मूलभूत विज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर शासकीय विज्ञान संस्थेत दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होणार आहे, अशी माहिती शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आर.जी.आत्राम यांनी दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय परिषदेचे आयोजन : विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शननवनवीन कल्पनांचे होणार आदानप्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय विज्ञान संस्था नागपूर आणि शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘मूलभूत विज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर शासकीय विज्ञान संस्थेत दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान होणार आहे, अशी माहिती शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आर.जी.आत्राम यांनी दिली.‘अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शशिकुमार चित्रे यांच्या हस्ते ६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय विज्ञान संस्थेत परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, ‘बीएआरसी’चे अध्यक्ष डॉ. जतिंदर याखमी, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी. सावंत उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर.जी. आत्राम राहतील. यावेळी शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे उपस्थित राहतील. परिषदेत भारताच्या विविध भागातील नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. यात राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी. सावंत, गणितज्ज्ञ डॉ. ए.एस. मुक्तीबोध, ‘आयआयटी-पवई’चे माजी अधिष्ठाता डॉ. ए.के. सिंग, विज्ञान प्रसारचे डॉ. अरविंद रानडे, सांख्यिकी शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र गोळे, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचा समावेश आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेमागील उद्देश असल्याचे डॉ. आत्राम यांनी सांगितले. या परिषदेच्या आयोजनात ‘मेडा’, विज्ञान प्रसार, विज्ञान भारती, ‘राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरेटरी’, नारायणा आयएएस अ‍ॅकेडमी व ‘स्वच्छ नागपूर’ यांचे सहकार्य लाभले आहे.परिषदेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ ७ मार्चला दुपारी ३.३० वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे, ‘बायो केअर’चे संचालक डॉ. सुहास बुधे उपस्थित राहतील. यावेळी शासकीय न्याय वैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्र्रागडे, विज्ञान संस्थेच्या प्रा. सुजाता देव, प्रा. आशिष बढिये, नीती कपूर, प्रा. हंसी बंसल, विज्ञान संस्थेचे ग्रंथपाल प्रा. रामदास लिहितकर, ‘स्वच्छ नागपूर’ संस्थेच्या अनुसया काळे उपस्थित होत्या.विद्यार्थीदेखील मांडणार संकल्पनापरिषदेत विद्यार्थी त्यांचे संशोधन व संकल्पना तोंडी आणि पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडणार आहेत. यात ‘केमिकल सायन्सेस’, ‘मेडिसिनल केमिस्ट्री’, ‘क्वॉन्टम मेकॅनिक्स’, ‘इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी’, ‘लाईफ सायन्स’, ‘मॅथेमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेस’, ‘फिजिकल सायन्सेस’, ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘फॉरेन्सिक सायन्सेस’, ‘सोलर एनर्जी’ या विषयांचा समावेश आहे.

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान