शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

रामटेक लोकसभेसाठी ‘हिंदू-दलित’ की ‘बौद्ध-दलित’ यावर भाजपमध्ये मंथन

By कमलेश वानखेडे | Published: January 04, 2023 1:14 PM

अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांची नावे चर्चेत : शिंदे गटाकडून खा. कृपाल तुमाने यांचा दावा

नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी विदर्भासह महाराष्ट्र दौरा करीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग फुंकले. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चत केले. प्रत्येक जागा हमखास कशी निवडून आणता येईल, यासाठी रणनीती आखली जात आहे. रामटेक लोकसभेसाठी उमेदवार हिंदू दलित द्यावा की बौद्ध दलित यावरही गंभीर मंथन सुरू झाले असून पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून याचा गुप्त आढावा घेतला जात आहे.

रामटेकमध्ये खा. कृपाल तुमाने सलग दोनदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. दोन्ही निवडणुका ते भाजपशी युतीत शिवसेनेच्या तिकिटावर लढले. राज्यातील सत्तांतरानंतर तुमाने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. यावेळी भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेची (शिंदे गट) युती होईल व रामटेकची जागा शिंदे गटासाठी सोडली जाईल, असा विश्वास तुमाने समर्थकांना आहे. न्यायालयाचा निर्णय काही वेगळा लागला व शिंदे गट भाजपमध्ये विलीन करण्याची वेळ आली तर तुमाने भाजपकडून लढतील, असेही कयास लावले जात आहेत.

भाजपमध्ये एवढी वर्षे राबलेल्या व्यक्तीलाच यावेळी संधी द्यावी, असा सूर भाजपमध्ये लावला जात आहे. मात्र, उमेदवार हिंदू दलित द्यावा की बौद्ध दलित यावर वेगवेगळी मते आहेत. खा. कृपाल तुमाने हे देखील हिंदू दलित असून दोन्ही वेळा काँग्रेसने दिलेल्या बौद्ध दलित समाजाच्या उमेदवाराला पराभूत करूनच ते विजयी झाले आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये व उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांची नावे चर्चेत आहेत. गजभिये हे बौद्ध दलित असून पारवे हे हिंदू दलित आहेत.

असे आहेत कळीचे मुद्दे

  • रामटेक लोकसभेत सुमारे १६ ते १८ टक्के (३ लाख ४० हजार) मतदार हे अनुसूचित जाती (एससी) आहेत.
  • यातील बौद्ध दलित मतदार हे सुमारे ९ टक्के असल्याचा अंदाज आहे.
  • रामटेकची जागा बौद्ध दलित उमेदवाराला दिली गेली तर त्याचा फायदा नागपूर लोकसभेसाठीही होऊ शकतो.
  • पण दहा वर्षांपासून हिंदू दलित उमेदवार येथून विजयी होत असताना ही जोखीम घेणे भाजपला परवडेल का ?
  • काँग्रेसने पुन्हा बौद्ध दलित उमेदवार दिला तर या समाजाची गठ्ठा मते एकतर्फी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंदू दलित उमेदवार दिला तर भाजपच्या मतांची काहीअंशी विभागणी होऊ शकते.
टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाramtek-acरामटेकKrupal Tumaneकृपाल तुमानेSudhir Parveसुधीर पारवे