शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

प्रशासनाचा चुकीनंतरही भावाचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय

By सुमेध वाघमार | Published: February 06, 2024 6:28 PM

मनोज शेंडे (२३) रा. हिंगणघाट मानोरा वर्धा त्या अवयवदात्याचे नाव. त्याचे आई-वडिल शेतीचे कामे करतात.

नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्याचा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान ‘ब्रेन डेथ’ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रशासनाच्या चुकीमुळे भावाचा मृत्यू झाल्याचे शल्य त्याला होते. त्यानंतरही त्याने लहान भावाचे अवयव दान करण्याचा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान मिळाले. 

मनोज शेंडे (२३) रा. हिंगणघाट मानोरा वर्धा त्या अवयवदात्याचे नाव. त्याचे आई-वडिल शेतीचे कामे करतात. त्याला तीन भाऊ आहेत. मनोज हा बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. प्राप्त माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी मनोज काही कामानिमित्त नागपुरला आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास वर्धाकडे दुचाकीने निघाला होता. अचानक रस्त्यात मोठा खड्डा आला. त्याची दुचाकी खड्ड्यात अडकून तो पडला. त्याचा मेंदूला मार बसला. लगेच त्याला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. त्याचा मेंदूमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाला होता. दोन दिवस झालेल्या उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता. त्याची प्रकृती न्युरोलॉजीकलदृष्ट्या खालवली. डॉक्टरांच्या एका पथकाने त्याला तपासून ‘ब्रेन डेथ’ म्हणजे मेंदू मृत  घोषीत केले. ‘एम्स’चे समन्वयक प्रतीम त्रिवेदी व प्राची खैरे यांनी मनोजचा मोठा भाऊ सूरज शेंडे (२६) याचे समुपदेशन करीत अयवदानाची माहिती दिली. रस्त्यावरील खड्ड्याने घेतलेला भावाचा हकनाक बळीचे शल्य सूरजला होते. परंतु सोबतच भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्यासाठीही त्याचे मन सांगत होते. अखेर त्याने भावाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. 

‘एम्स’मध्ये १३ वे अयवदान‘एम्स’मध्ये ‘ब्रेन डेथ’ झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे योग पद्धतीने समुपदेशन केले जात असल्याने आतापर्यंत १३ व्यक्तींकडून अयवदान होऊ शकले. यात एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. भरतसिंग राठोड, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम व डॉ. अनु केवलानी यांचा मोठा वाटा आहे.