लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अशोक अग्रवाल यांनी सांगितले, जैन स्वीट ऑरेंजच्या पाच जाती उपलब्ध आहेत. या नवीन जाती जास्त उत्पन्न देणाऱ्या लवकर व उशिरा काढणीस योग्य अशा आहेत. जमीन व पाण्याची सुपीकता व प्रत यानुसार या नवीन जातीपांसून शेतकरी सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादने घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. ‘स्टॉल’वरून मोसंबी लागवडीसाठी जमिनीची माहिती, लागवडीसाठी हवामान, जातीची माहिती, अभिवृद्धी व लागवड कशी करावी याची माहिती दिली जात आहे.पारंपरिक व आधुनिक लागवडीची तुलनाजैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना पारंपारिक व आधुनिक जैन स्वीट ऑरेंजची तुलनाची माहितीही दिली जात आहे. यात पारंपरिक पद्धतीत मोसंबी लागवड ही गादी वाफ्यावर जमिनीत केली जाते तर आधुनिक लागवडीमध्ये माती विरहित कपात ग्रीनहाऊसमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये खुंटापासून रोगांचा प्रसार होतो तर आधुनिक पद्धतीत खुंटापासून रोगाच्या प्रसाराला आळा बसतो. अशा अनेकबाबतीत तुलनात्मक माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.ठिंबकमधून ५० टक्के पाण्याची बचतअग्रवाल म्हणाले, ठिंबक सिंचनामधून ५० टक्के पाण्याची बचत होते. कारण पाणी हे जमिनीस न देता पिकांना दिले जाते. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. वाफसा स्थिती कायम राहत असल्यामुळे पिकाची सतत व जोमदार वाढ होते. पिकास पाणी दररोज अथवा गरजेप्रमाणे एक दिवसाआड देता येते. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. परिणामी, उत्पादनात वाढ, फळे दर्जेदार व एकसारखी येतात.
ब्राझील स्वीट ऑरेंजची पाच ‘व्हेरायटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:29 AM
‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
ठळक मुद्देजैन इरिगेशन सिस्टीमच्या स्टॉलमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती