शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नागपुरात विकास कामांना ब्रेक! मनपाची रस्त्यांची कामेही थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:38 AM

अर्थसंकल्पाच्या निम्माच म्हणजे १५०० कोटींचा महसूल वित्त वर्षात जमा होण्याची शक्यता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्तविली आहे. याचा फटका शहरातील विकास कामांना बसला आहे.

ठळक मुद्देअमृत व जेएन एनयूआरएम योजनेतील १०० कोटीचा वाटा कसा उचलणार?

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अर्थसंकल्पाच्या निम्माच म्हणजे १५०० कोटींचा महसूल वित्त वर्षात जमा होण्याची शक्यता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्तविली आहे. याचा फटका शहरातील विकास कामांना बसला आहे. पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण शहरातील रस्ते विकास, मलनिस्सारण योजना, पथदिवे, परिवहन, प्रस्तावित सीबीएससी शाळांचा प्रकल्प यासह अन्य प्रकल्पांचा यात समावेश आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेत मनपाला ४५.३५ कोटी तर अमृत योजनेत ५५ कोटींचा वाटा उचलायचा आहे. सार्वजनिक विद्युत वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४५ कोटींची गरज आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण करण्यासाठी २२७ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित आहे. मलनिस्सारण केंद्रासाठी १७९ तर बायो मायनिंगसाठी ४० कोटींचा खर्च करावयाचा आहे. हा खर्च अत्यावश्यकच आहे. परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती विचारात घेता आवश्यक निधी उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही.

शहरातील परिवहन यंत्रणा चालविण्यासाठी ११८ कोटी, वॉर्डातील विकास कामांसाठी १० कोटी, सार्वजनिक आरोग्य ३०.८२ कोटी, माहिती व तंत्रज्ञान २५.४२ कोटींची तरतूद केली आहे. तसेच मागासवर्गीय कल्याणासाठी ५६.१३, महिला बालविकास ५६.१३ कोटी, दिव्यांगांसाठी ५६.१३ तर क्रीडा विकासासाठी ४४.९० कोटींची तरतूद केली आहे. मनपाच्या तिजोरीत जमा होणारा महसूल व आस्थापना खर्च वजा केल्यास फार तर दोनशे ते तीनशे कोटी वाचतात. यातून कंत्राटदारांची देणी, कर्मचाऱ्यांची जुनी देणी जवळपास ६०० कोटींच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत विकासासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारकडूनही आर्थिक अनुदान मिळण्याची फारशी अपेक्षा नसल्याने मनपाच्या अडचणी वाढल्या आहेत.सीबीएसई शाळांसाठी हवे १०८ कोटीपुढील शैक्षणिक सत्रात महानगरपालिकेच्या सहा शाळा या इंग्रजी माध्यमात सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या शाळा सीबीएसईनुसार चालवण्याचा संकल्प आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक परिस्थिती विचारात घेता निधी उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही.विद्युत व्यवस्थेसाठी १४५ कोटी लागणारशहरातील पथदिव्यांची यंत्रणा अत्याधुनिक करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील सर्व स्ट्रीटलाईट स्मार्ट लाईटमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठी १४५ कोटींची तरतूद केली आहे. परंतु निधीअभावी हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.रस्त्यांच्या सुधारण्यासाठी १५९ कोटींची गरजएकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरातील सिमेंट रस्त्यातील मनपाचा वाटा १२५ कोटी, रस्त्यांची कामे व दुरुस्ती करण्यासाठी २५ कोटी लागणार आहेत. यासाठी तरतूद केली आहे. परंतु निधी उपलब्ध न झाल्याने कामे थांबली आहेत.मागास घटकांनाही फटकाअर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी यासाठी २१६.९९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी मागासवर्गीयांवर खर्च करावयाचा आहे. परंतु परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होताना दिसत नाही.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका