नागपूर : भाजपशी युती न करण्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेचे पडसाद शुक्रवारी नागपुरातही उमटले. या निर्णयाचे स्वागत करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर जल्लोष केला; तर दुसरीकडे भाजपने शिवसेनेचा बाण मोडण्यासाठी कंबर कसली. युतीत ब्रेक अप झाला असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील चर्चा थांबल्यामुळे आघाडीतही बिघाडी होण्याचे संकेत आहेत. युती तुटताच शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनात जल्लोष केला. पहिल्यांदाच सर्व जागांवर लढण्याची संधी मिळणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. युतीत आमच्या वाट्याला फक्त १८ जागा येत होत्या. उरलेल्या जागांवर भगवा फडकवायला संधीच राहत नव्हती. युती तुटल्यामुळे चालून आलेल्या या संधीचे शिवसैनिक सोनं करतील, असा दावा जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी केला. दुसरीकडे भाजपनेही बदलत्या परिस्थितीनुसार समीकरणे आखण्यास सुरुवात केली. भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे म्हणाले, नागपुरात शिवसेनेची ताकद नाही. त्यामुळे भाजपलाही युतीत रस नव्हता. पण शिवसेनेने आग्रह केला असता तर
युतीत ब्रेक अप, आघाडी आॅक्सिजनवर
By admin | Published: January 28, 2017 1:49 AM