शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

हुंड्यासाठी लग्न मोडले

By admin | Published: August 29, 2015 3:19 AM

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या आरोपीवर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर चंद्रभान कुंभारे असे आरोपीचे नाव आहे.

भूखंड, दुचाकी अन् सोन्याची मागणी नागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या आरोपीवर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर चंद्रभान कुंभारे असे आरोपीचे नाव आहे. तो डोंगरगाव (ता. हिंगणा) येथे राहतो. तो रेल्वेत नोकरी करीत असल्याचे सांगितले जाते. अजनीतील २० वर्षीय तरुणी बीएससीची विद्यार्थिनी असून, तिच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने तिला मागणी घातली. दोन्हीकडून बातचीत झाल्यानंतर १५ मे २०१५ ला साक्षगंधही करण्यात आले. यावेळी मुलीकडील मंडळींनी सोन्याची अंगठी, नवीन कपडे देऊन थाटामाटात साक्षगंधाचा कार्यक्रम केला. त्यासाठी त्यांना १ लाख २० हजार रुपये खर्च आला. लग्नानंतर किशोर त्या मुलीला बाहेर फिरायला नेऊ लागला. लग्न होणार असल्यामुळे मुलीनेही नकार दिला नाही. दरम्यान, हे सर्व झाल्यानंतर आरोपीने लग्न करण्यापूर्वी हुंडा म्हणून प्लॉट, दुचाकी आणि सोन्याचे दागिने पाहिजे, अशी अट घातली. हे सर्व देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून आरोपीने लग्नास नकार दिला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी किशोर व त्याच्या नातेवाईकांना समजावण्याचे प्रयत्न केले. मुलीनेही किशोरचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आरोपीने नकार देतानाच तिला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. तो मानत नसल्याचे पाहून पीडित मुलीने गुरुवारी अजनी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किशोर व त्याच्या नातेवाईकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)सराईत लग्नमोड्या आरोपी किशोर हा सराईत लग्नमोड्या आहे. त्याने यापूर्वीही अनेक तरुणी आणि त्यांच्या परिवाराची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची चर्चा आहे. तो वेषांतर करून तरुणींच्या परिवारापुढे स्वत:ला एखाद्या कलावंताप्रमाणे सादर करतो. रेल्वेत नोकरी आणि चांगली शरीरयष्टी असल्यामुळे त्याला स्थळ मिळते. साक्षगंध करताना अंगठी, नवीन कपडे आणि काही रोखही हातात पडते. त्यानंतर तरुणीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने इकडे तिकडे नेतो. कुकर्म करतो. मन भरल्यानंतर कोणते तरी कारण पुढे करून तो तरुणी व तिच्या परिवाराशी संबंध तोडतो. बदनामीच्या धाकामुळे कुणी पोलिसात जाण्याची हिंमत करीत नाही. त्याचाच हा आरोपी गैरफायदा घेतो, अशी चर्चा आहे.