लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी या इशारा रॅलीतील नियमभंगासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेतली.दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात इशारा रॅली काढण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास लोकमत चौकातूनच रॅलीला सुरुवात झाली. बजाज नगर, कॉफी हाउस चौक, महाराजबाग, व्हेरायटी चौक मार्गे रॅलीचा समारोप संविधान चौकात झाला. या रॅलीत कार्यकर्ते विना हेल्मेट दुचाकी चालवत होते. काही कार्यकर्ते चालत्या मोटरसायकलच्या मागील सीटवर उभे राहून घोषणा देत होते. काही कार्यकर्ते चक्क ‘ट्रीपल सीट’ होते. मात्र या रॅलीविरोधात वाहतूक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.पदाधिकारी म्हणतात, केले नियमांचे पालनया इशारा रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली आहे. रॅलीमध्ये आमच्या सर्वांकडे हेल्मेट होते. परंतु हेल्मेटमुळे घोषणा देत येत नसल्यामुळे त्यांना वाहनांच्या ‘डिक्की’त ठेवण्यात आले होते. आम्ही वाहतूक नियमांचे पालन केले व प्रत्येक सिग्नलला गाड्या थांबविल्या, असे प्रतिपादन बजरंग दलाचे नागपूर महानगर संयोजक मनीष मौर्य यांनी दिली.
नागपुरात बजरंग दलाकडून वाहतूक नियमांची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:35 AM
‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी या इशारा रॅलीतील नियमभंगासंदर्भात केवळ बघ्याची भूमिका घेतली.
ठळक मुद्देहा कसा ‘व्हॅलेन्टाईन डे’ विरोध? : वाहतूक पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका