शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

स्तन कॅन्सर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:35 AM

आॅक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णांची अधिक माहिती घेतली असता स्तन कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत देशभरात नागपूर शहर तिसºया क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देजनजागृती महिना : महिलांसोबतच पुरुषही पीडित, देशभरात नागपूर तिसºया क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णांची अधिक माहिती घेतली असता स्तन कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत देशभरात नागपूर शहर तिसºया क्रमांकावर आहे. महिलांसोबतच आता पुरुषांतही स्तन कॅन्सर आढळून येत आहे.अन्न नलिका व तोंडाचा कॅन्सर याबाबतीत नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शहरात दरवर्षी दहा हजार कॅन्सर रुग्णांची नोंद केली जाते. सध्या नागपूर शहरात कॅन्सरचे १२ हजार रुग्ण आहेत. नागपुरात दरवर्षी नवीन ५ हजार लोकांना कॅन्सरची लागण होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेडिकल सोबतच खासगी रुग्णांलयातही कॅन्सरच्या रु ग्णांची संख्या वाढत आहे.रुग्णांच्या संख्येत वाढजीवनमानातील बदल व हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये ३५ वर्षात तर पुरुषांना वयाच्या ४५ वर्षानंतर स्तन कॅन्सर आढळून येत आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार २०२० पर्यंत नवीन १७ लाख लोकांना कॅन्सर होईल. देशात गेल्या १६ वर्षात स्तन कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ५० टक्यांनी वाढली आहे. २००१ मध्ये स्तन कॅन्सरचे ७,९७,६५७ रुग्ण आढळले होते. तर २०१६ मध्ये १२,१९,६४९ रु ग्ण आढळून आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कॅन्सर रुग्णालय व अनुसंधान केंद्राकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २८ टक्के महिला स्तन कॅन्सरने पीडित असल्याचे आढळून आले आहे. तसेच पुरुषांमध्येही स्तन कॅन्सरचे रुग्ण आढळून येत आहेत.पुरुषांच्या कॅन्सरमध्ये नागपूर प्रथमराज्यात पुरुषांच्या कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ८० वयोगटातील नागपुरात ८८.६ टक्के रुग्ण आहे. यात मुंबईत ८४ टक्के, पुणे ८१.१ टक्के तर औरंगाबादमध्ये ४२ टक्के रुग्ण आढळून आले आहे. महिलांच्या कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ८० वर्षापर्यंत ८०.२ टक्के रुग्ण आढळून आले आहे. दुसºया क्रमांकावरील मुंबई शहरात ६८.१ टक्के, पुणे ६७.२ तर औरंगाबाद शहरात ३७.७ टक्के महिला पीडित आहे.स्तन कॅन्सर होण्याची कारणेराहणीमानातील बदल, हार्मोन्समध्ये बदल, मेनोपॉज, उशिरा लग्न होणे, उशिराने मातृत्व, स्तनपान न करणे आदी कारणांमुळे स्तन कॅन्सर होण्याचा धोका असतो. पुरुषात हार्मोन्समधील बदलामुळे कॅन्सर होत आहे.रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय : ३५ वर्षाच्या महिलांत स्तन कॅन्सरच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक मुंबई शहराचा, दुसरा दिल्ली तर तिसºया क्रमांकावर नागपूर आहे. देशातील महानगरातील कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.- डॉ. बी.के.शर्मा,सहसंचालक, राष्ट्रसंत तुकडोजीविभागीय कॅन्सर हॉस्पिटल