शहरात १४ लाखांवर खासगी वाहने नागपूर : नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील चार-पाच रस्ते सोडल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात, असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. गेल्या वर्षात खासगी वाहनांच्या संख्येत ६० हजाराने भर पडली आहे. त्या त्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ ७ टक्केच आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागपूरकरांचा श्वास गुदमरतोय.शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी ते ३० स्पटेंबर २०१३ या नऊ महिन्याच्या कालावधीत ७७० अपघात झाले असून यात तब्बल १९९ जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक मृत्यू कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी रिंगरोडवर सर्वात जास्त ६५ अपघात तर मृत्यूची संख्या ४४ वर गेली आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटारसायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शहरवासीयांना वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गर्दीच्या तासांमध्ये तासभरही उभे राहणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत (स्टार बसेस) खासगी वाहनांची संख्या ५५ पटींनी अधिक असल्याचे दिसून येते. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, आॅटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने असतात. रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्यइतर खासगी वाहनांच्या तुलनेत रस्त्यावर दुचाकीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. २०१३ मध्ये ११ लाख २९ हजार ९४९ दुचाकींची नोंदणी झाली, तर या वर्षी यात सुमारे ६ लाख दुचाकींची भर पडली. (प्रतिनिधी)खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडीचे कारणगेल्या १० वर्षात नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनीच वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये खासगी वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती. २०१३ मध्ये १३ लाख ५८ हजारावर पोहचली. या वर्षी ती १४ लाखांच्या वर गेली आहे. रस्ता रु ंदीकरण करून वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे जनआक्रोश या सामाजिक संस्थेचे सचिव रवी कासखेडीकर यांचे म्हणणे आहे.
उदंड वाहनांमुळे गुदमरतोय श्वास
By admin | Published: October 26, 2014 12:17 AM