नागपूर : विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उत्सवात सारे भाविक दंगले आहेत. आपल्या पापाची, वाईट कर्माची क्षमा मागून भविष्यात कोणतेही वाईट काम हातून घडू नये, अशी याचना सर्वसाधारण भाविक बाप्पाकडे करीत आहेत. मात्र, लाचखोर त्याला अपवाद आहेत. त्यांना बाप्पांचीही भीती नाही. काम घेऊन आलेल्यांकडून चिरीमिरी उकळण्यात ते व्यस्त असतात. अशातीलच एक स्वास्थ्य निरीक्षक आणि एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. मंगळवारी नागपूर आणि रामटेकमध्ये ही कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये स्वास्थ निरीक्षक असलेला संजय लक्ष्मणराव नगराळे (वय ५३) हा सफाई कामगारांना गैरहजरी लावण्याची धमकी देऊन लाच उकळतो, अशी ओरड होती. सूरज तुरकेल याला २ हजार तर सिध्दार्थ नारनवरे या सफाई कर्मचाऱ्याला नगराळेने धाक दाखवून ४ हजारांची लाच मागितली होती. या दोघांनीही सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नगराळेची तक्रार केली. त्यावरून जैन यांनी कारवाईचे आदेश दिले.(प्रतिनिधी)पहिल्यांदा दोन तक्रारदारएका लाचखोराविरुद्ध एकाच वेळी दोन जणांनी तक्रार करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. अधीक्षक जैन यांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला. मंगळवारी हुडकेश्वर परिसरात पहाटे ५ च्या सुमारास तुरकेल आणिं नारनवरेने नगराळेला अनुक्रमे २ आणि ४ हजारांची लाच दिली. ती स्वीकारताच पोलीस निरीक्षक आसाराम शेटे,हवालदार विलास खनके, नायक संतोष पुंडकर, चंद्रनाग ताकसांडे यांनी नगराळेच्या मुसक्या बांधल्या.दुसरी कारवाई खुमारीतरामटेक : अतिवृष्टीमुळे घर आणि शेतीचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी खुमारी (ता. रामटेक) येथे करण्यात आली. दत्तू कामडे (४२, रा. पालोरा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. धनराज शंकर ठाकूर (४७, रा. सत्रापूर) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. बोरडा (सराखा) ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या सत्रापूर येथे त्याचे घर आहे. ७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ते घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. तसेच त्याच्याकडील शेत पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची भरपाई म्हणून शासनाकडून दोन धनादेश आले आल्याचे धनराजला सांगण्यात आले. यासाठी त्याने बँकेचे खातेक्रमांक तलाठ्याला दिले. सदर धनादेश मिळावे म्हणून धनराजने तलाठ्याकडे पाठपुरावा केला. दरम्यान तलाठी कामडे याने पाच हजार रुपये दिल्याशिवाय तुझे काम होणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले होते.
लाचखोरांना बाप्पाचीही भीती नाही
By admin | Published: September 23, 2015 6:28 AM