लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारवाई न करण्याच्या बदल्यात भररस्त्यावर १०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत वाहतूक पोलीस शिपायी जितेंद्र साखरे याला शुक्रवारी सायंकाळी निलंबित केले तर, त्याचे वरिष्ठ म्हणून कार्यरत असलेल्या दोघांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले.ग्रेट नागरोडवरच्या अशोक चौकात वाहतूक पोलीस शिपाई साखरे बेशिस्त वाहनचालकांनाच्या कागदपत्रांची तपासणी करीत असल्याचे व्हिडीओत दिसते. पुढे कारवाई न करण्यासाठी त्याच्या खिशात कुणी नोट कोंबताना दिसतो. तर एक वाहनचालक त्याच्या वाहनाच्या डिक्कीत १०० ची नोट ठेवून तेथून सटकताना दिसतो. तत्पूर्वी, संबंधित वाहनचालकांना साखरे कारवाईच्या नावाखाली मोठ्या रकमेचा दंड होईल, असाही धाक दाखवताना दिसतो. त्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीत १०० ची नोट ठेवल्यानंतर संबंधित तरुणाला तो समज देऊन तेथून चालते करतो. गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेतील हा गैरप्रकार व्हिडीओच्या रुपाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी त्याची गंभीर दखल घेत शिपाई साखरेला शुक्रवारी सायंकाळी निलंबित केले तर, त्याचे वरिष्ठ म्हणून कार्यरत असलेला बिट इन्चार्ज पीएसआय सानप आणि अन्य एकाची वाहतूक शाखेतुन उचलबांगडी केली. या दोघांना पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले.--गैरप्रकाराची गय नाहीअशा प्रकारे गैरप्रकार करून पोलिसांची प्रतिमा मलिन करणाºया पोलीस अधिकारी-कर्मचाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस उपायुक्त (वाहतूक) एस. चैतन्य यांनी दिला आहे.
लाचखोरीची व्हिडीओ व्हायरल, पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:34 AM
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारवाई न करण्याच्या बदल्यात भररस्त्यावर १०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी त्याची तात्काळ दखल घेत वाहतूक पोलीस शिपायी जितेंद्र साखरे याला शुक्रवारी सायंकाळी निलंबित केले तर, त्याचे वरिष्ठ म्हणून कार्यरत असलेल्या दोघांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात ...
ठळक मुद्देनागपूरच्या ग्रेट नागरोडवरील घटना