शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

व्हॅटअंतर्गत ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी ;शासनाकडे ‘कॅट’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:10 AM

राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

ठळक मुद्देविक्रीकर विभागातर्फे रिटेल व्यापाऱ्यांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क                 नागपूर : राज्य शासनाने व्हॅटअंतर्गत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ‘मिसमॅच’ समाधान योजना आणावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.‘कॅट’च्या सेंट्रल एव्हेन्यू येथील सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, महाराष्ट्रात व्हॅटमधील नोंदणीकृत रिटेल व्यापारी व्हॅट भरून माल खरेदी करतात, पण कंपन्यांचे विक्रेते सरकारी खजिन्यात कराची रक्कम जमा करीत नाहीत. त्यामुळे सरकार नोंदणीकृत व्यापाऱ्यांना वस्तूंच्या पूर्ण किमतीवर व्हॅट भरण्यास सांगते. तसे पाहता वितरकांतर्फे खरेदी केलेल्या मालावर एमआरपीच्या जवळपास ८० टक्के किमतीवर व्हॅट पूर्वीच गोळा होतो. पण खरेदीवेळी नोंदणीकृत रिटेल व्यापाऱ्यांनी पूर्ण व्हॅट भरल्याचे सरकार विसरते. अशास्थितीत रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देणे हा अन्याय आहे. अनेक रिटेल व्यापारी कम्पोझिशन स्कीममध्ये असून त्यांच्याकडून सरकारला कराचा पूर्ण पैसा मिळाला आहे. त्यानंतरही वसुलीच्या भूमिकेत विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना त्रास देणे सुरूच आहे.नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, विक्रीकर विभाग ज्या लोकांनी कर वा रिटर्न भरला नाही, अशांना सोडून इमानदार रिटेल व्यापाऱ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे विभागाची प्रतिमा व्यापाऱ्यांमध्ये खराब होत आहे. त्यामुळे व्यापारी कायद्यापासून दूर जात आहेत.रिटेल व्यापारी मोठ्या कंपन्यांचा माल त्यांनी नियुक्त केलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी करतात. अशास्थितीत जर विक्रेता संग्रहित केलेला व्हॅट सरकारकडे भरत नसतील तर त्याची जबाबदारी कंपन्यांनी घ्यावी, असे अनिल नागपाल म्हणाले.ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, ही बाब विक्रीकर विभागाच्या सहआयुक्तांसमोर वारंवार मांडली. लेखी निवेदनही दिले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट रिटेल व्यापाऱ्यांवर दंड आकारला. विभागाच्या नोटीसने व्यापारी त्रस्त असून तोडगा न निघाल्यास आंदोलनाची भूमिका राहील.कार्यक्रमात ‘कॅट’चे चेअरमन गोपाल अग्रवाल, अध्यक्ष किशोर धाराशिवकर, महासचिव फारुखभाई अकबानी, सुभाष जोबनपुत्रा, राजकुमार गुप्ता, निखिलेश ठाकर, रवींद्र गुप्ता, रवींद्र पडगिलवार, मोरेश्वर काकडे, मधुसूदन त्रिवेदी, विजय गुप्ता, रमेश उमाठे, सतीश बंग, आरिफ खान, स्वर्णिमा सिन्हा, छाया शर्मा, मीना वसाक, ज्योती अवस्थी, जयश्री गुप्ता, एस.बी. भुतोलिया, रेखा चतुर्वेदी आणि संजीवनी चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर