शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला चाकू मारून केले जखमी

By दयानंद पाईकराव | Published: January 02, 2024 1:39 PM

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तहसिल पोलिसांनी दिली.

दयानंद पाईकराव, नागपूर : क्षुल्लक कारणावरून आईवडिलांशी भांडण केल्यानंतर मोठ्या भावाच्या घरातील सामान फेकून त्याला चाकु मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहित उर्फ मारी नामदेव चांदेकर (वय २८, रा. खिरणी, हनुमान मंदिराजवळ, शिवाजीनगर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर विक्की नामदेव चांदेकर (वय ३२, रा. लाकडीपुलाजवळ, तेलीपुरा) असे गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.

रविवारी ३१ डिसेंबरला रात्री ११.१५ वाजता आरोपी रोहित हा विक्की चांदेकर यांच्या घरी आला. त्याने आईवडिलांसोबत वाद घालून घरातील सामान फेकणे सुरु केले. विक्की यांनी सामान का फेकत आहे, अशी विचारना केली असता आरोपीने त्यांच्यासोबत भांडण करून हाताबुक्क्यांनी मारहाण करून आपल्या जवळील चाकुने विक्की यांच्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. विक्की यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्याम सोनपराते यांनी आरोपी रोहितविरुद्ध कलम ३२६, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. आरोपी रोहित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती तहसिल पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी