शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बहिणीला जगविण्यासाठी भावाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:42 AM

३२ वर्षीय नाहिद हिचा आता कुठे संसार फुलला होता. पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षांच्या मुलीमुळे घरपण आले होते. परंतु नियतीची चक्रे फिरली आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली.

ठळक मुद्देकिडनी निकामी, हृदयाचाही आजार : कुरेशी कुटुंबाला हवा मदतीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३२ वर्षीय नाहिद हिचा आता कुठे संसार फुलला होता. पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षांच्या मुलीमुळे घरपण आले होते. परंतु नियतीची चक्रे फिरली आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. यावर उपचार सुरू असताना हृदयाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. तिचा पती हातमजुरी करणारा. यामुळे भावाने त्याच्याकडे होता नव्हता तो सर्व पैसा उपचारात लावला. पुढील उपचार करण्यासाठी भावाची आता परिस्थिती राहिली नाही. बहिणीला जगवावे तरी कसे, या चिंतेने या कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.बहिणीच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून असलेले साजीद अंजुम हे त्या भावाचे नाव. नाहिद अंजुम कुरेशी (३२) रा. गड्डीगोदाम, हे त्याच्या बहिणीचे नाव.घरची स्थिती नाजूक असताना साजीदने बहीण नाहिदला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. तिचे शिक्षण केले. लग्न लावून दिले. तिचा संसाराचा गाडा रुळावर येत असतानाच नाहिदची प्रकृती खालवत गेली. तपासणीत दोन्ही किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच मोठा धक्का कुटुंबाला बसला. तरीही बहिणीला जगविण्याच्या जिद्दीने कर्ज काढून उपचार सुरू ठेवले. दीड वर्ष होत नाही तोच हृदयाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. यामुळे उपचाराचा खर्च वाढला. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगून २५ लाख रुपयांची सोय करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून साजीद पैशांसाठी दारोदारी फिरतोय.परंतु एवढा पैसा उभा करणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास बहीण वाचेल, तिच्या मुलांना, घराला मोठा आधार मिळेल ही एकमेव आशा आहे.हवे मदतीचे बळनाहिद अंजुम कुरेशी हिला समाजाच्या मदतीच्या हाताची गरज आहे. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. नाहिद अंजुम कुरेशी यांना मदत करू इच्छिणाºयांनी तिचा भाऊ साजीद अंजुम यांच्या सदर येथील जम्मू काश्मीर बँक खाता क्रमांक २९८०४०१००००५४४७ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. साजीद यांच्याशी ९३७०९९२०५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.