शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची वाहनचालकाला अमानूष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:25 PM

नागपूर - वर्धा मार्गावरच्या टोलनाक्यावरची घटना : लाठ्यांनी बदडले, व्हिडीओ व्हायरल.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : कुठल्याशा किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी एका वाहन चालकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. वर्धा मार्गावरील वडगाव नजिकच्या टोल नाक्यावर बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका वाहनचालकाने या अमाणूष मारहाणीचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना आणि कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीमुळे नेहमी चर्चेत असणारा 'टोल नाका' पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, एक तरुण वाहनचालक आज सायंकाळी या टोलनाक्यावरून वाहन घेऊन जात होता. टोलची रक्कम अन् दुसऱ्या कुठल्याशा कारणावरून टोलवरील कर्मचाऱ्यासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढत गेला. त्यानंतर टोलवरील कर्मचारी तसेच गार्डसनी त्या तरुणाला हातबुक्क्या तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला. गंभीर परिणामाची कल्पना आल्यामुळे टोलवरील कर्मचाऱ्यांनी लगेच अॅम्बुलन्स बोलवली आणि त्याला नागपूरच्या दिशेने घेऊन गेले. त्या जखमी तरुणाचे नाव काय, तो कुठला आणि त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले, ते कळले नाही. मात्र, या बेदम मारहाणीच्या घटनेच्या वेळी वर्धा येथील रहिवासी प्रवीण हिवरे जात होते. त्यांनी मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या मित्रमंडळींना पाठवून सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, हिवरे यांनी या घटनेची लेखी तक्रार नागपूर विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.

विशेष म्हणजे, टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचे वर्तन अत्यंत उर्मट असल्याचे आणि वाहनधारकांसोबत ते अपमाणजनक पद्धतीने बोलतात, अशी नेहमीचीच ओरड आहे.घटना घडल्याचे मान्य, मात्र...

या संबंधाने वादाचे कारण जाणून घेण्यासाठी या टोल नाक्याचे कामकाज बघणारे हर्षल देवके आणि राहुल डांगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी घटना घडल्याचे मान्य केले. मात्र, टाळी एका हाताने वाजत नसल्याचे म्हणत 'त्या' कारचालकाने आधी टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्याचे दगडाने डोके फोडले. त्यामुळेच नाक्यावरील मुलांनी त्याला मारहाण केल्याचे म्हटले. जखमी तरुणाला बुटीबोरीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी