लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसपाची नागपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महेश सहारे यांची बसपाचे शहराध्यक्ष तर विलास सोमकुंवर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यासोबतच नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांची प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. घोडेस्वार आणि उषा बौद्ध यांची नागपूर जिल्हा इन्चार्ज म्हणून निवड करण्यात आली आहे.बसपाचे राष्ट्रीय महासचिव रामअचल राजभर, खा. डॉ. अशोक सिद्धार्थ आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या निर्देशानुसर ही निवड करण्यात आली आहे. शहर कार्यकारिणीमध्ये अभिषेक शंभरकर -उपाध्यक्ष, नितीन शिंगाडे- महासचिव, विनोद मेश्राम-कोषाध्यक्ष, सुरेंद्र डोंगरे सचिव, तर चंद्रशेखर भंडारे, मुकेश मेश्राम, सुनंदा नितनवरे, शशांक डोंगरे, उमेश मेश्राम, कुलदीप लोखंडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.जिल्हा कार्यकारिणीमध्ये सुभाष गजभिये-उपाध्यक्ष, सहदेव पिल्लेवान-महासचिव, सुनील बारमाटे-कोषाध्यक्ष, रुपराव नारनवरे-सचिव आणि राजेश फुलझेले, तपेश पाटील, सोमेश माटे, रोहित वालदे, सुरेश मानवटकर, रंजना ढोरे आणि विनोद धनविजय यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.जिल्हा भाईचारा कमिटीनागपूर जिल्ह्यातील भाईचारा कमिटीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे. यात नगरसेवक मो. इब्राहीम टेलर (मुस्लीम भाईचारा), अमित सिंह (चर्मकार भाईचारा), संदीप खडसन (आदिवासी भाईचारा), गोपाळ खंबाळकर (हलबा भाईचारा), भगवान गोंडे (गोवारी भाईचारा), राजू चांदेकर (तेली भाईचारा), सुरेश आदमने (कलार भाईचारा), धनराज घड्याळ (वाल्मिकी भाईचारा) आणि त्रिभुवन तिवारी यांची (ब्राह्मण भाईचारा) पदी निवड करण्यात आली आहे.
नागपूर बसपाची नवीन कार्यकारिणी जाहीर; सहारे शहराध्यक्ष, सोमकुंवर जिल्हाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:05 PM
बसपाची नागपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महेश सहारे यांची बसपाचे शहराध्यक्ष तर विलास सोमकुंवर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देजितेंद्र घोडेस्वार प्रदेश महासचिव, उषा बौद्ध जिल्हा इन्चार्ज