लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांना पुरुषी मानसिकतेच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. देशातील समस्त महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीवच बाबासाहेबांनी करून दिली. या देशात महिलांच्या हक्कांना, कर्तव्यांना त्यामुळे कायदेशीर अधिष्ठान मिळाले आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ शकले. बाबासाहेबांच्या याच विचारांचा वारसा चालवीत ‘मातृशक्ती’च्या उद्धारासाठी ‘बसपा’ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी येथे केले. शनिवारी चंद्रमणीनगर गार्डन येथील पवार विद्यार्थी सभागृहात बसपाचा महिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत हाेते.
महिलांनी सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन करीत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसपाकडून महिलांना योग्य प्रमाणत भागीदारी दिली जाईल, असे आश्वासनही ताजने यांनी दिले.
यावेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, नागोराव जयकार, रवींद्र गवई, महेंद्र रामटेके, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, नितीन शिंगारे, विजय कुमार दहाट, शहराध्यक्ष राजू भांगे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, वीरंका भिवगडे, ममता सहारे, नरेंद्र वालदे, इब्राहिम टेलर, संजय बुरेवार, रमाताई गजभिये, प्रवीणा शेळके, तेजस्विनी धुर्वे, सविता पाटील, पुष्पा बेडसे, सत्यभामा लोखंडे, हर्षला जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित हाेते.