लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल यांना पक्षाने निलंबित केले आहे. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांना या पदावरून हटविण्याबाबत अद्याप कोणत्याही स्वरूपाचे निर्देश महापालिका सभागृहाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मो. जमाल अजूनही गटनेतेपदावर कायम आहेत. परंतु महापालिका मुख्यालयातील कक्षापुढील गटनेत्याच्या नावाचा फलक काही जणांनी हटविला. अर्थसंकल्पाच्या विशेष सभेत जमाल यांनी हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निगम सचिवांना चौकशीचे निर्देश दिले.विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही स्वरूपाचे निर्देश प्राप्त नसल्याने अजूनही मी गटनेता आहे. असे असतानाही माझ्या नावाची पाटी हटविण्यात आली. पाटी काढणाऱ्याचे नाव मला माहीत आहे. परंतु मी जाहीर करणार नाही. हा गंभीर प्रकार असल्याचे सांगून जमाल यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले. याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. निगम सचिवांवर याची जबाबदारी द्यावी, अशी सूचना केली. विशेष म्हणजे या प्रकरणात लोकप्रतिनिधी दोषी आढळून आल्यास त्याच्या विरोधात अनुशासनात्मक कारवाई होऊ शकते. जमाल यांना पदावरून हटविण्याच्या मुद्यावरून बसपात दोन गट पडले आहेत. पाटी कुणी काढली, याचा उलगडा चौकशीनंतर होणार आहे.
नागपुरात बसपातील वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:09 PM
महापालिकेतील बसपाचे गटनेते मो. जमाल यांना पक्षाने निलंबित केले आहे. परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांना या पदावरून हटविण्याबाबत अद्याप कोणत्याही स्वरूपाचे निर्देश महापालिका सभागृहाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मो. जमाल अजूनही गटनेतेपदावर कायम आहेत. परंतु महापालिका मुख्यालयातील कक्षापुढील गटनेत्याच्या नावाचा फलक काही जणांनी हटविला. अर्थसंकल्पाच्या विशेष सभेत जमाल यांनी हा मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली. त्यानुसार कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निगम सचिवांना चौकशीचे निर्देश दिले.
ठळक मुद्देगटनेत्याच्या नावाची पाटी काढली : महापौरांचे चौकशीचे आदेश