शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जन्मशताब्दी भवनासाठी बसपाचा इशारा

By admin | Published: September 15, 2016 2:54 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनाचे काम सुरूव्हावे, यासाठी बसपाने संविधान चौकात धरणे आंदोलन करीत शासनाला अंतिम इशारा दिला.

तातडीने काम सुरू करण्याची मागणी : संविधान चौकात धरणे नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनाचे काम सुरूव्हावे, यासाठी बसपाने संविधान चौकात धरणे आंदोलन करीत शासनाला अंतिम इशारा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूर महानगरपालिकेने यशवंत स्टेडियम समोरील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (शोध केंद्र) बांधण्याचा प्रस्ताव ३१ डिसेंबर १९९२ रोजी एकमताने मंजूर केला होता. हे सभागृह पाच हजार प्रेक्षक क्षमतेचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व ग्रंथालय तसेच व्हीआयपी व व्हीव्हीआयपींचे कार्यक्रम होतील असा प्रस्ताव आहे. त्याला २५ वर्षे लोटली आहेत. दरम्यान काँग्रेस १५ व भाजप १० वर्षांपासून सत्तेत आहे. परंतु आंबेडकर स्मारकच्या नावाने एक वीटही लावली नाही. यासंदर्भात अनेक संघटनांनी वेळोवेळी निवेदने दिली. आंदोलने केली परंतु काम सुरू झाले नाही. त्यामुळे बसपाने बुधवारी धरणे आंदोलन करीत या विषयावर शासनाला अंतिम इशारा दिला आहे. या विषयावर राज्यभरात आंदोलन पेटवण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. महापौर व मनपा आयुक्तांना मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले. धरणे आंदोनात बसपाचे उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश प्रभारी प्रेम रोडेकर, जितेंद्र म्हैसकर, सागर डबरासे, विश्वास राऊत, उत्तम शेवडे, रमेश लोखंडे, राजेंद्र पडोळे, विवेक हाडके, पृथ्वीराज शेंडे, नरोगाव जयकर, राजकुमार बोरकर, मनपा गटनेते गौतम पाटील, रूपेश बागेश्वर, कविता लांडगे, सागर लोखंडे, मनीषा घोडेस्वार, किरण पाटणकर, अभिषेक शंभरकर, रोहित वालदे, कपिल राऊत, हर्षवर्धन डोईफोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)