शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:26 AM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे

नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी प्रतिक्रिया माजी राज्यसभा सदस्य व लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे.सीतारामन यांनी प्राप्तिकराचे दर कमी करताना शिताफीने 80-सी कलमाखाली स्टँडर्ड डिडक्शन, एचआरए, पीएफ या सवलती काढून घेतल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा फक्त ५ लाख ते १५ लाख करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच होईल. इतर करदात्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही.

डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स (डीडीटी) हटविल्याबद्दल दर्डा यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांचा तसेच म्युच्युअल फंड आणि विदेशी गुंतवणूकदारांना फायदा होईल. परंतु कंपनीचे प्रवर्तक असलेल्या श्रीमंत व्यक्तींना द्यावा लागणारा प्राप्तिकर ३४ टक्क्यांवरून ४३ टक्के झाला आहे. त्यामुळे संपत्ती निर्माण करणाºया उद्योगपतींचा कर बोजा वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणूक होणार नाही व रोजगार निर्मितीलाही खीळ बसेल.

सीतारामन यांनी १० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असणाºया कंपन्यांच्या विक्रीवर ०.०१ टक्का ट्रान्झक्शन टॅक्स लावला आहे. याचा तोटा हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या बड्या कंपन्यांना होणार आहे. कारण कर ५० लाखापेक्षा अधिक वार्षिक विक्रीवर वसूल करायचा आहे. त्यामुळे त्याचा बोजा डिस्ट्रीब्युटर्स, स्टॉकिस्टस्, डीलर्स या सर्वांवर पडणारा आहे व करभरणा करणे अत्यंत किचकट होणार आहे.

विदेशात राहणारे भारतीय गुंतवणुकीचा मोठा स्रोत आहे. परंतु या अर्थसंकल्पात अनिवासी भारतीयांची व्याख्या बदलून विदेशातील वास्तव्य १८० दिवसांऐवजी २४० दिवस केले आहे. अशी व्यक्ती उरलेले दिवस जर इतर कुठल्याही देशात राहत असेल तर ती व्यक्ती निवासी भारतीय ठरवली जाईल व तिला विदेशातील उत्पन्नावर भारतात प्रचलित दराने प्राप्तिकर भरावा लागेल. यामुळे देशात अनिवासी भारतीयांची गुंतवणूक थांबेल.या अर्थसंकल्पामुळे मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे व म्हणून उद्योग व अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMaharashtraमहाराष्ट्रVijay Dardaविजय दर्डा