ठळक मुद्देमहानगर क्षेत्राकडे वाटचालमागील वर्षाच्या तुलनेत १९८.७१ कोटींनी कमीअनधिकृत ले-आऊटच्या विकासासाठी तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने डिसेंबर २०१७ पर्यंत नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) बरखास्त करून नासुप्रच्या शहरातील मालमत्ता व योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नासुप्रची महानगर क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे. या सोबतच नासुप्रच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या योजना व अभिन्यासातील विकास कामे विचारात घेता सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नासुप्रचा २०१८-१९ या वर्षाचा ६११ कोटी ९१ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला.८१ वर्षे पूर्ण झालेल्या नासुप्रची वाटचाल आता नागपूर महानगर क्षेत्राकडे होत आहे. शहरातील मूलभूत सोई सुविधा आणि शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नासुप्रद्वारे आतापर्यंत विविध उपक्रम हाती घेण्यात आले, ज्यामध्ये सर्वसाधारण विकास योजना, पुन:निर्माण योजना, रस्ते, निवास, भावी विस्तार, जल व मलनिस्सारण योजना, अभिन्यासाचा विकास करण्यासाठी रस्ते,जलवाहिन्या, नळाच्या पाईप लाईन,पावसाळी नाल्या, अशी विविध कामे नासुप्रने स्वत:च्या निधीतून केल्याची माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली.नासुप्रचे २०१८-१९ वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प ६११ कोटी ९१ लाखांचा असून २०१७-२०१८ या वित्तीय वर्षाचा सुधारित ८१० कोटी ६२ लाखांचा आहे. यावेळी नासुप्रचे विश्वस्त व महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, भूषण शिंगणे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, नगररचना विभागाचे सहसंचालक नि.सी.अढारी, महाप्रबंधक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. हेमंत ठाकरे, वित्त अधिकारी पंडित घुगे आदी उपस्थित होते.मूलभूत सुविधांसाठी २०.१५ लाखपुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात ५७२ व १९०० अभिन्यासात समाज भवन, रस्ते, फूटपाथ, मलवाहिका, जलवाहिका, पावसाळी नाल्या, या मूलभूत सुविधांसाठी २० कोटी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दलित वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी व महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता विशेष अनुदान इत्यादी शीर्षखाली नागपूर शहरात ही कामे केली जातील.पट्टेवाटपाला गतीनागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांची मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. शासनाने ती पूर्ण केली. त्यानुसार डीप्टी सिंग्नल,पँथरनगर,आदर्श नगर,नेहरू नगर,प्रजापती नगर येथे एकूण २४८२ पट्टे वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. यातील ५४५ पट्टे वाटप करण्यात आले.झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणनागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर बसलेल्या इतर झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाचे काम नासुप्रने हाती घेतले होते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये संजय गांधी नगर(दक्षिण नागपूर),सोनबाजी नगर(पूर्व नागपूर),गुलाबबाबा झोपडपट्टी(मध्य नागपूर),इंदिरा नगर(उत्तर नागपूर)येथील एकूण ६५१ झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्याला मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
- पुढील वर्षात ५७२ व १९०० अभिन्यासातून ४१ कोटी १० लाखाचे उत्पन्न अपेक्षित
- ५७२ व १९०० अभिन्यासमध्ये मूलभूत सुविधावर ४५ कोटी ५५ लक्ष खर्च प्रस्तावित.
- अनधिकृत अभिन्यासातील विकास कामांसाठी ४० कोटींची तरतूद.
- विकासाची विविध कामे व डांबरीकरण व सिमेंट रोडसाठी ९७ कोटींची तरतूद.
- अंबाझरी भागातील जलतरण तलावाचे बांधकाम व दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख.
- संविधान प्रस्ताविका पार्कसाठी २ कोटी ५३ लाख.
वर्षभरात राबविलेले प्रकल्प व नाविन्यपूर्ण उपक्रम
- नासुप्रद्वारे या वर्षी ८१३६ मागणी पत्र (डिमांड लेटर) देण्यात आले.
- नागपूर शहरातील अभिन्यासमाधील भूखंडाचे ४०९० प्रकरणात नियमितीकरण.
- अभिलेख्याचे स्कॅनिंग करून सर्व अभिलेख स्कॅन करण्याचे नियोजन .
- एकूण १८,८२,००० अभिलेखाचे स्कॅनिंग झालेले आहे.
- राजीव गांधी सभागृहाच्या बाजूला मोकळ्या जागेवर आरोग्य उद्यान
- ओमकार नगर चौक रिंग रोड ते बेसापर्यंत सिमेंट रोडवर ८ कोटी ६७ लाखांचा खर्च
- मौजा मानेवाडा बालाजी नगर येथे ३ कोटींची ई-लायब्ररी, काम प्रगतिपथावर
- मानेवाडा रिंग रोड ते बेसा चौक रस्त्याचे कामावर ५.७० कोटींचा खर्च प्रस्तावित,३.५० कोटींचे काम पूर्ण
- नासुप्रच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीवर ६० किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लॅन्ट