शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बग्गा खुनातील सेंगरचा जामीन फेटाळला

By admin | Published: May 11, 2017 2:47 AM

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात नीलेश ऊर्फ बग्गा विठ्ठल कौरती याच्या खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात नीलेश ऊर्फ बग्गा विठ्ठल कौरती याच्या खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या न्यायालयाने मरारटोली येथील रहिवासी आरोपी नरेंद्रसिंग ऊर्फ बबल्या दिवाकर सेंगर (३०) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. १६ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी अजय भाऊराव मेश्राम हा बग्गासोबत फुटाळा तलावाचा फेरफटका मारण्यासाठी गेला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या घराकडे परत आले होते. बग्गा हा आपल्या घरासमोर थांबून अजयसोबत बोलत असताना बग्गाला बबल्या सेंगर याचा फोन आला होता. माझ्या आईला ‘हार्ट अटॅक’ आला आहे, तू माझ्या घरी ये, असे बबल्याने म्हटले होते. दोघेही बबल्याच्या घराकडे जात असताना मरारटोली माता मंदिरनजीकच्या प्रशांत ज्वेलर्ससमोर मुकुंद खंडाते, राहुल ऊर्फ टेमर खंडाते, प्रणय कावळे आणि बाल्या सेंगर सर्व रा. तेलंगखेडी मरारटोली यांनी बग्गावर हल्ला केला होता. यावेळी अजय मेश्राम पळून गेला होता. बग्गाला नजीकच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. मुकुंद खंडाते आणि बग्गा यांच्यात जुने वैमनस्य होते. त्यातून हा खून करण्यात आला होता. आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सेंगर याने जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी जामिनावर बाहेर येताच साक्षीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.