शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भुकेल्या वानरांसाठी ‌‘सेतू’ बांधा रे ‘सागरी...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:15 AM

Nagpur News monkey गोसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये गत १० दिवसापासून अडकलेल्या भुकेलेल्या वानरांसाठी ‘सेतू’ कोण बांधणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

ठळक मुद्दे१० दिवसांपासून गोसेखुर्दच्या पाण्यात 

  अभिमन खराबे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपू : प्रभू श्रीरामचंद्रांना लंकेत पोहोचविण्यासाठी वानरसेनेने सेतू उभारला होता. या सेतूच्या बळावरच राम लंकेत पोहोचले आणि रावणाचा अंत केला. त्रेतायुगातील या सेतूचा आजच्या कलयुगातही दाखला दिला जातो. मात्र नागपूर जिल्ह्यातील सिर्सी (ता. कुही) येथे गोसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये गत १० दिवसापासून अडकलेल्या भुकेलेल्या वानरांसाठी ‘सेतू’ कोण बांधणार, असा प्रश्न विचारला जात आहे. गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’मुळे सिर्सी गावाचा संपूर्ण परिसर पाण्याखाली आला आहे. 

पाण्यात आलेल्या झाडावर अंदाजे १५० हून अधिक माकडे (वानर) अडकली आहेत. सभोवताल पाणी असल्याने तसेच माकडांना पोहता येत नसल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नाही. १० दिवसापासून झाडावरच मुक्कामी असलेल्या या माकडांना ‘रेस्क्यू’करून वाचविणे गरजेचे आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वॉटर’ कमी-अधिक होत असते. 

पाण्याची पातळी कमी होताच शिंगाड्यांंच्या वेलींचा आधार घेत काही माकड झाडावर गेली. त्यातच पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी भूक शमविण्यासाठी सुरुवातीला झाडाची पाने खायला सुरुवात केली. १० दिवसात झाडाची संपूर्ण पाने खाऊन संपल्याने त्या माकडांनी आता झाडाची साल ओरबाडून खायला सुरुवात केली आहे.

‘रेस्क्यू ऑपरेशन’ होणार का?ही बाब लक्षात येताच परिसरातील शिवशंकर गेडेकर, विवेक भुडे, लोकेश चौधरी, मंगेश शेंडे, स्वप्निल करुडकर, वृषभ रोहणकर, रजत तिरपुडे, कुणाल पाटील, आकाश पोहनकर, विकास दिघोरे, राकेश कळंबे, अनिल डहारे यांनी त्या माकडांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश न आल्याने त्यांनी या माकडांबाबत तीन दिवसापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. परंतु वन कर्मचाऱ्यांनी त्या माकडांना अद्यापही पाण्याबाहेर काढले नाही, अशी माहिती या तरुणांसह नागरिकांनी दिली. त्यांना वाचविण्यासाठी वन विभागाने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :MonkeyमाकडGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प