शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

इमारती सागवान दाखविले जळाऊ

By admin | Published: May 19, 2016 3:00 AM

बाजारपेठेत सोन्यासारखा भाव असलेल्या अस्सल इमारती सागवान लाकडाला जळाऊ दाखवून त्याची अवैध वाहतूक करण्याचा ...

कऱ्हांडला अभयारण्यात अवैध वृक्षतोड : लाकूड तस्करांचा असाही चमत्कारअभय लांजेवार/शरद मिरे  उमरेडबाजारपेठेत सोन्यासारखा भाव असलेल्या अस्सल इमारती सागवान लाकडाला जळाऊ दाखवून त्याची अवैध वाहतूक करण्याचा गोरखधंदा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसरात ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच या धंद्यातील दोन नंबरी दलालांचे-अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. इमारती सागवानची वाहतूक करायची आणि जळाऊ लाकडाची वाहतूक केल्याची एन्ट्री मारायची, अशा या गंभीर प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत याचा छडा लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या आणि भिवापूर येथून १० किमी अंतरावर असलेल्या पाऊणगाव शिवारात महिनाभरापासून सागवानावर आरी चालविण्याचे काम सुरू होते. मरू नदीच्या काठावर तसेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य परिसराने वेढलेला हा भाग गावकुसाबाहेर असल्याने याठिकाणी फारसे कुणीच भटकत नाही. याचाच लाभ पदरात पाडून घेत झाडे तोडण्याचे पाप करण्यात आले. अशाही परिस्थितीत लोकमतने ‘आॅन दी स्पॉट’ गाठत सागवन कत्तल प्रकरण उजेडात आणले.गेट बाहेर अन् गाव आतपाऊणगाव हे सुमारे ४५० लोकवस्तीचे गाव अभयारण्याने वेढले आहे. काही अंतरावरच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे चेक पोस्ट आहे. या ठिकाणी ये-जा करताना नोंदवहीत नोंद करावी लागते. याशिवाय आत-बाहेर जाता येत नाही. हे गेट गावाबाहेर अन् गाव आत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना वनविभागाच्या हिटलरशाहीला नेहमीच तोंड द्यावे लागते.१८ वाहनांची नोंदमे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सागवान आणि जळाऊ लाकडाच्या १८ वाहनांची नोंद चेक पोस्टवरील नोंदवहीत करण्यात आली आहे. यापैकी बहुतेक नोंदी अर्धवट आहेत. या नोंदीत मालाचा तपशील, दिनांक आणि वेळ नमूद नाही. याबाबतचा लोकमतकडे पुरावा उपलब्ध आहे. या नोंदीनुसार आतापर्यंत इमारती सागवान २७.४९३ घनमीटर तसेच जळाऊ आणि चॉक टिंबरची वाहतूक ३०.५ भर (जळाऊ लाकडाचा ढीग) करण्यात आली आहे. भिवापूर येथील वन विभागाच्या चमूने १५ मे रोजी अवैध सागवान वाहतुकीचा भंडाफोड केला. यामध्ये इमारती लाकडाला जळाऊ दाखविण्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे १८ वाहनांमधून असा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हा सारा प्रकार उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या चेक पोस्ट मधून होत असताना या भागाचे वनपरिक्षेत्राधिकारी गोविंदा फागोजी लुचे यांच्या कसे लक्षात आले नाही, असा सवाल विचारला जात आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून योग्य दिशेने तपास झाल्यास या संपूर्ण प्रकरणाचे पितळ उघडे पडणार आहे. शिवाय, वन आणि वन्य जीवांसाठी काम करण्याचा आव आणणाऱ्यांचाही बुरखा फाटेल, असे बोलल्या जात आहे.