लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खामला येथील (गोपालनगर) गणेश गृहनिर्माण सोसायटी येथील अभिन्यासावर १९९२ पासून असलेल्या १४ घरांच्या अतिक्रमणावर नासुप्रच्या पथकाने शनिवारी हातोडा चालविला. तसेच मोकळ्या जागेवरील अतिक्रमणाचा सफाया केला.मौजा-खामला, खसरा क्रमांक ५-६/९, येथील २ एकर जागा गणेश गृहनिर्माण सहकारी सोसायटीला नासुप्रने मंजूर केली होती. मंजूर नकाशानुसार व करारनाम्यानुसार येथील ४२३५ चौ. मी. जागेतील ४४ भूखंड संस्थेला वाटप करावयाचे होते. परंतु उर्वरित ८ भूखंडावर तसेच मोकळ्या जागेवर १९९२ पासून अतिक्रमण करण्यात आले होते. गृहनिर्माण संस्थेचे वकील आनंद परचुरे यांनी उच्च न्यायालयात नासुप्र सभापतींच्या विरुद्ध अवमानना याचिका दाखल केली होती. या अवमानना याचिकेवरील सुनावणी करताना २०१६ मध्ये पारित केलेले अतिक्रमण काढण्याच्या आदेशाचे पालन करण्याकरिता नासुप्रला ११ सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. नासुप्रतर्फे संबंधितांना २०१६ मध्ये अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजावली होती. शनिवारी नासुप्रच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या परिसरातील अतिक्रमण हटविले. नासुप्रचे कार्यकारी अभियंता (पश्चिम) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर, अतिक्रमण अधिकारी वसंत कन्हेरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.
९२ वर्षांपासूनच्या अतिक्रमणावर बुलडोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:35 AM
खामला येथील (गोपालनगर) गणेश गृहनिर्माण सोसायटी येथील अभिन्यासावर १९९२ पासून असलेल्या १४ घरांच्या अतिक्रमणावर नासुप्रच्या पथकाने शनिवारी हातोडा चालविला.
ठळक मुद्देनासुप्रची कारवाई : १४ घरांचे अतिक्रमण हटविले