वाडी : हाेळीच्या पंचमीला वाडी नजीकच्या लाव्हा येथे बैलाविना धावणाऱ्या बैलगाड्यांची दरवर्षी माेठी यात्रा भरते. यावर्षी काेराेना संक्रमणामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आयाेजकांनी दिली.
या यात्रेला २५० वर्षाची परंपरा आहे. यावर्षी ही यात्रा २ एप्रिल राेजी आयाेजित केली जाणार हाेती. मात्र, यात्रेवर काेराेना संक्रमणाचे सावट निर्माण झाल्याने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शनिवारी (दि. २७)लाव्हा येथील साेनबा बाबा मंदिराच्या सभागृहात यात्रा आयाेजक, ग्रामपंचायत पदाधिकारी व पाेलिसांची संयुक्त विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. वाढते काेराेना संक्रमण लक्षात घेता ही यात्रा यावर्षी रद्द करण्यात आल्याचा निर्णय या सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
यात्रेच्या दिवशी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून, कुणीही या यात्रेला येऊ नसे तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयाेजकांनी केले. या सभेला सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, माजी पंचायत समिती उपसभापती सुजित नितनवरे, उपसरपंच महेश चोखांद्रे, सोनबा बाबा उत्सव समिती अध्यक्ष गणेश हिरणवार, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत चिपडे, पोलीस कॉन्सटेबल संजय गायकवाड, हवालदार अनिल आगरकर, ग्रामविकास अधिकारी विकास लाडे, शेषराव गोरले, नितीन गोरले, गजानन गोरले, देवनाथ गोरले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बोरकर, महादेव वानखेडे, माजी उपसरपंच रॉबिन शेलारे, माणिक वानखेडे, अशोक आगरकर, अशोक वानखेडे, विलास ढोणे, रामकृष्ण धुर्वे, शुभम गोरले, रामदास खैरकर उपस्थित होते.