शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

२०० कोटींची होणार बंपर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:25 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तसे बजेटही पूर्वीपासून असते.

ठळक मुद्देसर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह : व्यापारी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तसे बजेटही पूर्वीपासून असते. दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून येतो. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केले आहे. दसºयाला गाडी घरी नेणार आहेत. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दीची अपेक्षा आहे. फ्लॅटचे बुकिंंग याच शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता यावर्षी दसºयाला जवळपास २०० कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच बाजारपेठांवर जीएसटीचा काहीही परिणाम होणार नाही, असे चित्र आहे.कार, दुचाकीची विक्री होणारयावर्षी सप्टेंबर महिन्यात वाहने खरेदी करण्यासाठी दसºयाचा मुहूर्त उत्तम आहे. अन्य दिवशी खरेदी करण्याऐवजी दसºयाला खरेदीकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे बहुुतांश ग्राहकांनी कार वा दुचाकीचे पूर्वीच बुकिंग केले आहे. विविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी २५ टक्के वाहनांची विक्री दसºयाला होणार आहे. त्यात मारुती व ह्युंडई कंपनीचा सर्वाधिक वाटा राहील. नागपुरातील चार डिलरच्या माध्यमातून जवळपास एक हजार कार विक्रीची मारुती सुझुकी शोरूम संचालकांची अपेक्षा आहे. देशातील १६ कार उत्पादकांचे नागपुरात शोरूम आहेत. सर्व कंपन्यांच्या गाड्यांच्या विक्रीची आकडेवारी पाहिल्यास दसºयाला दोन हजार कार विक्रीचा अंदाज आहे. याशिवाय दुचाकीच्या विक्रीत नागपूर मागे नाही. होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा, बुलेट, महिन्द्र या कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दुचाकीचे आगाऊ बुकिंग केले आहे. जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त दुचाकी विक्रीचा संचालकांचा अंदाज आहे. दसºयाला चारचाकी आणि दुचाकी बाजारपेठांमध्ये जवळपास १४० कोटींची उलाढाल होणार आहे.सोन्याच्या दागिन्यांना मागणीदसºयाच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येकजण किमान एक ग्रॅम सोने विकत घेतो. सोन्याचा कायम स्थिरावलेला दर पाहता यावर्षी सराफा बाजारात मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा सराफांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ग्राहकांची आवड लक्षात घेता अनेक लहानमोठ्या शोरूमने एका ग्रॅमपासून दागिने प्रदर्शित केले आहेत. जास्त वजनाचे दागिने खरेदी करण्यासाठी अनेकांनी आधीच आॅर्डर दिली आहे. त्या दिवशी दागिने घरी नेतील. यादिवशी चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मोठी मागणी असते. या बाजारात २० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा आहे.इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दीगेल्या काही वर्षांत अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यात मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन आदींचा समावेश आहे. अनेकांनी पूर्वीच शोरूमला भेट देऊन उपकरणाचे बुकिंग केले असून दसºयाच्या मुहूर्तावर घरी नेणार आहे. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली आहे. याशिवाय दसºयाला लॅपटॉप खरेदी करणाºयांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या खरेदीसाठी उपलब्ध योजनांचे पोस्टर शोरूममध्ये लावले आहे. उपकरणांच्या विक्रीचा आकडा निश्चित सांगणे कठीण असले तरीही यावर्षी २५ ते ३० कोटींपर्यंत उलाढाल होण्याची अपेक्षा शोरूमच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. ब्रॅण्डेड उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले.प्रॉपर्टी बाजारात उत्साहगेल्या काही दिवसांपासून प्रॉपर्टी बाजारात उत्साह संचारला आहे. नोटाबंदी, जीएसटी, रेरा आदींमधून हे क्षेत्र बाहेर निघाले आहेत. आता प्रॉपर्टीच्या किमती सर्वात कमी असून यापुढे वाढतील, असे क्रेडाई नागपूर मेट्रोच्या पदाधिकाºयांचे मत आहे. दसºयाच्या मुहूर्तावर अनेक बिल्डर्स व विकासकांनी आकर्षक योजना दाखल केल्या आहेत. रेराअंतर्गत जवळपास ३५० प्रकल्प नोंदणीकृत असून त्यामध्ये १२ हजारांपेक्षा जास्त घरकुल उपलब्ध आहेत. बँकांच्या कमी व्याजदराच्या कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदी सुलभ झाली आहे. या शिवाय पंतप्रधान निवासी योजनेत लोकांना २.६७ लाखांपर्यंत सवलत मिळत आहे. विविध योजनांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत दसºयाला सर्वाधिक फ्लॅटची विक्री होणार असल्याचे बिल्डर्सने सांगितले. युनिटनुसार नव्हे तर रुपयात ही खरेदी कोट्यवधींची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.