नगरपालिकांची नोटीस : जप्तीची टांगती तलवारजीवन रामावत नागपूरविदर्भातील केवळ शेतकरीच कर्जबाजारी नसून, या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कृषी विभागाच्या डोक्यावरसुद्धा कोट्यवधीच्या थकबाकीचे ओझे तयार झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार नागपूर विभागातील बहुतांश कृषी कार्यालये भाड्याच्या घरात सुरू आहेत. मात्र असे असताना कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून त्या इमारतींचे भाडे दिलेले नाही. शिवाय नगरपालिकांचा करसुद्धा भरलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या डोक्यावर सुमारे १ कोटी २० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी झाली आहे. यात काही नगरपालिकांनी आपल्या करवसुलीसाठी थेट कृषी विभागाला नोटीस बजावल्याची माहिती आहे. शिवाय काही कार्यालयांवर जप्तीची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृषी सहसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केला. त्याचवेळी नागपूर जिल्ह्यातील उप विभागीय कृषी कार्यालये आणि तालुका कृषी कार्यालयांवर तब्बल २६ लाख ४८ हजार ७१२ रूपयांची थकबाकी असल्याची माहिती पुढे आली.
कृषी विभागावर थकबाकीचा भार
By admin | Published: March 13, 2016 3:13 AM