शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

‘मेट्रो’मुळे कमी व्हावा वाहतुकीचा भार

By admin | Published: November 03, 2015 3:34 AM

‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प एक संजीवनी ठरणार आहे. शहराच्या

नागपूर : ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीसाठी मेट्रो रेल्वे प्रकल्प एक संजीवनी ठरणार आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात रेल्वे धावणार असल्याने नागपुरातील वाहतुकीचे वाढते संकट दूर होणार आहे. पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा तसेच नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ बनविणारा हा प्रकल्प आहे. सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. प्रकल्पात केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकार २० टक्के, मनपा ५ टक्के आणि नासुप्रचा ५ टक्के वाटा आहे. सध्या कंपनीकडे राज्याचे १९८ कोटी, केंद्राचे १४३ कोटी आणि नासुप्रचे १५० कोटी असे एकूण ४९१ कोटी रुपये आहेत. प्रकल्पासाठी जागेचे अधिग्रहण आणि आर्थिक संकट दूर झाले आहे. जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेने ३७०० कोटी रुपयांचा निधी कर्जस्वरुपात उपलब्ध करून दिला आहे. ३० जानेवारी २०१४ रोजी शासनाने आणि २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारने नागपूर रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८६८० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प २०१८ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. (प्रतिनिधी)निधीचा प्रश्न सुटलामेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीचा प्रश्न सुटला आहे. कंपनीला ४५०० कोटी कर्जस्वरुपात उभे करायचे आहे. त्यात जर्मनी येथील केएफडब्ल्यू बँकेने ३७०० कोटी रुपये कर्जस्वरुपात २० वर्षांच्या मुदतीवर देण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर ही रक्कम टप्प्याटप्प्याने कंपनीला केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून मिळणार आहे. तर उर्वरित रक्कम फ्रान्सची कंपनी देणार आहे. लहान-मोठ्या ७८ जागांचे अधिग्रहणप्रकल्पासाठी जागेच्या अधिग्रहणाची समस्या आता संपली आहे. मनपा, नासुप्र, मिहानची जागा कंपनीच्या ताब्यात असून एसआरपीएफ फायरिंंग रेंजच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर-दक्षिण मार्ग १९.६५८ कि़मी. आणि पूर्व पश्चिम मार्ग १८.५५७ कि़मी. अर्थात दोन्ही मार्ग एकूण ३८.२१५ कि़मी.चे राहणार आहे. प्रकल्पाला लागणाऱ्या बहुतांश जागा शासनाच्या ताब्यात आहेत, पण लहानमोठ्या ७८ जागांचे अर्थात ३.५० हेक्टर जागेचे अधिग्रहण करावे लागेल. चर्चेद्वारे आणि शासनाच्या योजनेंतर्गत जागेचा मोबदला देण्यात येणार आहे. रेल्वे सौर ऊर्जेवर धावणारनागपूर हे सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात तापमान ४८ डिग्रीवर पोहोचते. हे तापमान या प्रकल्पासाठी वरदान ठरणार आहे. प्रकल्पाला इको फें्रडली बनविण्यासाठी रेल्वे सौर ऊर्जेवर धावणार आहे. अधिकाधिक उष्णता शोषून वीज तयार होऊ शकेल, अशा मेट्रोच्या इमारती आणि छताचे डिझाईन तयार करण्यात येत आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असून त्याद्वारे ४० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची अपेक्षा आहे. इको फ्रेंडली मेट्रो रेल्वेहा प्रकल्प इको फ्रेंडली राहणार आहे. प्रारंभीपासूनच मेट्रोतून ३.५० लाख प्रवासी दररोज प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. मुंजे चौकात २५ मीटर उंच अद्ययावत व देखणे टॉवर बनणार असून त्यावर रेल्वे धावणार आहे. याशिवाय अंबाझरी तलावावर एक हॅँगिंग स्टेशन राहील. यावरून प्रवाशांना तलावाचे सौंदर्य निरखून पाहता येईल. ‘माझी रेल्वे’ अशी भावना नागपूरकरांमध्ये निर्माण व्हावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे. छोटे-छोटे स्टेशन राहणारअन्य मेट्रोच्या तुलनेत (सहा ते दहा मिनिटे) नागपूर मेट्रो रेल्वे प्रत्येक दीड मिनिटात धावेल, अशी संवादावर आधारित सर्वोत्तम वाहतूक नियंत्रण (सीबीटीसी) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे मेट्रो स्टेशन मोठे बनविण्याची गरज भासणार नाही.मिहान येथून कामाचा प्रारंभमिहान (खापरी) येथील ३८ हेक्टर जागा कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे प्रारंभी या ठिकाणावरून मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. मेट्रो रेल्वे भूमिगत धावणार नाही. पण मिहान (खापरी) येथील कॉरिडोअर आणि तेथून पुढे ४.६ कि़मी.चा टप्पा जमिनीवर राहणार आहे. मेट्रोच्या आॅफिसला कॉर्पोरेट लूक मेट्रो रेल्वेच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम नासुप्रच्या रामदासपेठ, सेंट्रल बाजार रोड, लेन्ड्रा येथील ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर वेगात सुरू असून वर्षभरात पूर्ण होणार आहे. २३ कोटींचा अपेक्षित खर्च आहे. इमारत सात मजली (तळमजला व सहा मजले) असून चारही बाजूला लॅण्ड स्केपिंग, हिरवळ आणि वृक्ष लावण्यात येणार आहे. या कार्यालयातून मेट्रो रेल्वेच्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. भारतीय बनावटीची उपकरणेप्रकल्पाला लागणारी उपकरणे भारतीय बनावटीची राहतील. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथील कारखान्यातील कोच आणि वाहतुकीसाठी फ्रान्स किंवा जर्मनी देशातील सीबीटीसी यंत्रणा राहणार आहे. त्यामुळे जास्त गाड्या चालविता येतील. बांधकाम दिवसरात्र सुरू राहणार आहे. यासाठी ओव्हरहेड क्रेन राहणार आहे.प्रशासकीय इमारतीची रचना४भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौरस मीटर४४०५५.४४ चौरस मीटर तळघर व तळमजल्यावर ११२ कार, २३४ स्कूटर व २२४ सायकलसाठी पार्किंग.४पहिला ते पाचव्या मजल्यावर प्रत्येकी ९१२ चौरस मीटर क्षेत्रात कार्यालय.४सहा मजल्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० चौरस मीटर क्षमतेचे आॅडिटोरियम असे एकूण २०१३ चौरस मीटर.वेबसाईटवर कामाची माहितीमेट्रो रेल्वे प्रकल्प आणि विकास कामांची माहिती देण्यासाठी कंपनीने वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर टप्प्याटप्प्याने होणाऱ्या विकास कामांची माहिती अपडेट करण्यात येत आहे. प्रवाशांची अंदाजे संख्या (लाखांत)वर्षअंदाजे प्रवासी २०२१३.८४२०२६४.१९२०३१४.५९२०३६५.०८२०४१५.६४मेट्रो मार्गाची लांबी (कि़मी.)कॅरिडोअरस्टेशनएकूण लांबीआॅटोमोटिव्ह चौक१७१९.६५८ ते मिहान (खापरी)प्रजापतिनगर ते १९१८.५५७लोकमान्यनगर एकूण ३६३८.२१५मेट्रो रेल्वेची वेबसाईट६६६.ेी३१ङ्म१ं्र’ल्लँस्र४१.ूङ्मेमेट्रोमुळे लोकांचे जीवनमान उंचावणारजलद परिवहनासाठी नागपुरात मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील. हा प्रकल्प कुणालाही त्रास न होता २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. मेट्रो माझ्यासाठी आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. गाड्या पार्किंगमध्ये ठेवून मेट्रोने प्रवास करावा, असे उद्दिष्ट आहे. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा हा प्रकल्प आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याचा मेट्रोचा उद्देश आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्पाचे काम सुरू असून त्यात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या विकासात भर टाकणारा हा प्रकल्प आहे.बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.