शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड, १८ दुचाकींसह ६ आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:41 AM

अटक करण्यात आलेल्या या सहा जणांनी धानाेली येथे दाेन घरफाेड्या केल्याची कबुली दिली असल्याचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नागपूर : ग्रामीण भागात दुचाकी वाहने चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चाेरट्यांच्या टाेळीतील सहा चाेरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ आणि गुन्ह्यात वापण्यात आलेल्या २ अशी एकूण १८ दुचाकी वाहने व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या वाहनांची एकूण किंमत १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. २४) करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सहाही जण वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या वाहनांची पाहणी करून ती नियाेजनबद्धरीत्या चाेरून न्यायचे. ती वाहने चाबी न वापरता डायरेक्ट कनेक्शन करून सुरू करायचे. याची माहिती त्यांनी यू-ट्यूबवरून आत्मसात केली हाेती. चाेरून नेलेल्या वाहनांच्या मूळ नंबर प्लेट त्यांनी फेकून दिल्या हाेत्या. त्यामुळे पाेलिसांनी ट्रीय गुन्हे अभिलेख प्रणालीच्या नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्युराेच्या पाेर्टलवरून या वाहनांच्या नाेंदणी क्रमांकाची पडताळणी केली.

अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांमध्ये निखिल ज्ञानेश्वर पुडके (२०, रा. धानाेली, ता. माैदा), तेजस ज्ञानेश्वर झाडे (२१, रा. बाेरी गाेवारी, ता. माैदा), भावेश किशाेर जुनघरे (१८), पीयूष अजय मस्के (१९), मयूर माेरेश्वर भाेयर (१९) व सुयश दिवाकर भिसेकर (१९) चाैघेही रा. वडाेदा, ता. कामठी या सहा जणांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहन चाेरीचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेने या घटनांचा समांतर तपास करायला सुरुवात केली हाेती.

या वाहन चाेरीत निखिलचा सहभाग असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तातडीने माैदा परिसरातून ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने गुन्ह्यांची माहिती देत साथीदारांची नावेही सांगितली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उर्वरित पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीची १८ दुचाकी वाहने तसेच पाच माेबाईल फाेन जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.

दाेन घरफाेड्यांची कबुली

अटक करण्यात आलेल्या या सहा जणांनी धानाेली येथे दाेन घरफाेड्या केल्याची कबुली दिली असल्याचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी सांगितले. त्यांच्याकडून बुलेट, स्प्लेंडर प्लस, पॅशन, पल्सर, ॲक्टिव्हा, ज्युपिटर या वाहनांसह पाच माेबाइल फाेन जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी ही वाहने माैदा, उमरेड, कुही व नंदनवन नागपूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरून नेली हाेती. आराेपी निखिल पुडके याच्याकडे साेन्याची लगडही आढळून आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीbikeबाईक