लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : चाेरट्याने घरात प्रवेश करून ९६ हजार रुपये राेख व ३० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने असा एकूण १ लाख २६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचघाट (पुनर्वसन) येथे गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. चाेरट्याचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेतली हाेती.
मुकुंद दशरथ भदाडे, रा. चिचघाट (पुनर्वसन), ता. माैदा हे गुरुवारी कामानिमित्त धुसाळा (जिल्हा भंडारा) येथे गेले हाेते. घरी त्यांची पत्नी व मुलगा हाेता. दाेघेही मध्यरात्री गाढ झाेपेत असताना चाेरट्याने मागच्या भागाच्या दाराची कडी काडून आत प्रवेश केला आणि कपाटातील ३० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने, ६० हजार राेख व पॅन्टच्या खिशातील ३६ हजार ६०० रुपये राेख असा एकूण १ लाख २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चाेरून नेला.
याच चाेरट्याने शेजारी राहणाऱ्या गाेपीचंद भदाडे यांच्याकडील किरायेदाराच्या घरी चाेरी करण्याचा प्रयत्न केला. किरायेदार जागे असल्याचे लक्षात येताच चाेरट्याने पळ काढला. मात्र, चाेराची चाहूल लागताच किरायेदाराने शेजाऱ्यांसह मुकुंद भदाडे यांना फाेनवर माहिती दिली. मुकुंद यांनी याची माहिती फाेनवर लगेच पत्नी व मुलाला दिली. त्यांची घरातील कपाट तपासले असता, चाेरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी चाेरट्याविरुद्ध भादंवि ३८०, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...
लग्नापूर्वीच चाेरट्याने केला हात साफ
चाेरटा हा सराईत असल्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला. गावात काही अनाेळखी व्यक्ती वस्तू विकायला आणतात. वस्तू विक्रीदरम्यान ते गावातील घरांची टेहळणी करतात. त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मुकुंद यांचा मुलगा संजू याचे पांजरा, ता. तिराेडा, जिल्हा गाेंदिया येथे लग्न जुळले असून, १ जुलैला लग्नाचा मुहूर्त आहे. त्यामुळे मुकुंद यांनी खरेदीसाठी उचल केलेल्या रकमेसाेबतच वधूच्या वडिलांनी संजूला कपडे खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम व दागिने चाेरट्याने लंपास केले.