शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

नागपुरात निवृत्त अधिका-याकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:59 PM

सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देरोख आणि दागिने लंपास : सोनेगावमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोनेगावमधील मनीष ले-आऊटमध्ये राहणा-या एका निवृत्त अधिका-याच्या घराच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी रात्री ही घरफोडीचाी घटना उघडकीस आली.सुशीलकुमार सिद्धेश्वर ठाकूर (वय ६५) हे एका सिमेंट कंपनीत मुंबईला उच्चपदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते नागपुरात स्थायिक झाले. त्यांचे सोनेगावच्या मनीष ले-आऊटमधील नागपूर गृह निर्माण सोसायटीत निवासस्थान आहे. २६ जूनला ठाकूर दाम्पत्य त्यांच्या दाराला कुलूप लावून बिहारमध्ये गेले होते. बुधवारी रात्री ते परत आले. त्यांनी आपल्या वाहनचालकाला घरून कार घेऊन रेल्वेस्थानकावर येण्यास सांगितले. चालक ठाकूर यांच्या घरी कार घ्यायला गेला असता त्याला मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकुलूप तुटून दिसले. चालकाने कार रेल्वेस्थानकावर नेल्यानंतर ठाकूर यांना कारमध्ये बसविले आणि रस्त्यात घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसल्याची माहिती सांगून घरात चोरी झाली असावी, असा संशय व्यक्त केला. परिणामी ठाकूर यांनी कारचालकाला सरळ सोनेगाव ठाण्यात चलण्यास सांगितले. ठाकूर यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक उल्लेवार आपल्या सहकाऱ्यांसह ठाकूर यांच्या घरी पोहचले. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त करून ४५ हजारांची रोकड, सोन्याचांदीचे दागिने आणि अन्य चिजवस्तूंसह ३ लाख, ५५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले.चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेगाव पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर