लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : चाेरट्याने एकाच रात्री दाेन ठिकाणी घरफाेडी तसेच शाळेत चाेरी गेल्याची घटना काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेखारा येथे साेमवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. यात चाेरट्याने राेख रक्कम, साेन्या-चांदीचे दागिने व शाळेतील इतर साहित्य असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला.
चाेरट्याने जाॅन डिसुजा, रा. विद्यानगर, बाेखारा यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम चाेरून नेली. विशेष म्हणजे, चाेरट्याने डिसुजा यांच्या घरातील ज्या कपाटातून दागिने व राेख पळविली, त्या कपाटाजवळ घरातील सदस्य झाेपलेले हाेते. त्यांना चाेरट्याच्या पायाचा अथवा कपाट उघडण्याचा आवाज आला नाही. त्यामुळे त्यांच्या नाकाजवळ गुंगीचे औषध स्प्रे केले असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. डिसुजा यांच्या शेजारी राहणारे बबन ठाकरे यांच्याही घराचे दार ताेडले असल्याचे आढळून आले. घटनेच्यावेळी बबन ठाकरे यांच्या घरी कुणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडील नेमके काेणते साहित्य चाेरीला गेले, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
कोराडी येथील तेजस्विनी विद्यालयात चाेरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात चाेरट्याने शाळेतील इलेक्ट्रॉनिक लॅबमधील काही साहित्याची ताेडफाेड केली असून, तेथील जड वस्तू तसेच छतावरील सौर ऊर्जेचे पॅनल केबल, इलेक्ट्रिक मोटरपंप व इतर साहित्य चाेरून नेले. या तिन्ही घटनांमध्ये चाेरट्याने एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला असल्याचे पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.