सावनेर : चाेरट्याने सावनेर शहरात घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आली.
सत्यवान दिलीपसिंग ब्रह्मोरे (५१, रा. नाईक लेआऊट, सावनेर) कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याने घरी कुणीही नव्हते. त्यातच चाेरट्याने कम्पाउंड गेट व घराच्या मुख्य दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील ३८ हजार ५०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व १५ हजार रुपये राेख असा एकूण ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक नागवे करीत आहेत.