खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा येथे १९ ते २४ एप्रिलदरम्यान घडली.
माेहम्मद सबा आलम माेहम्मद परवेज आलम (२२, रा. क्वाॅर्टर नं. बी/५ सिल्लेवाडा) हा आपल्या घराला कुलूप लावून नागपूर येथे गेला हाेता. दरम्यान, घराचे कुलूप ताेडून चाेरट्याने घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील आलमारीत सुटकेसमध्ये ठेवलेले ३४ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने व राेख सात हजार रुपये असा एकूण ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. शनिवारी (दि.२४) ही बाब लक्षात येताच माेहम्मद सबा आलम याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहेत.