शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

नागपुरात बस ऑपरेटर्सना १५ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 8:47 PM

परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘आपली बस’ ऑपरेटरचे देखभालीकडे दुर्लक्ष : तीन बस डेपोतील ३२६ बसची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा मिळावी म्हणून बस ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु बसची देखभाल होत नसल्याने नागरिकांचा चांगली सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी कर्मचाऱ्यांचे तीन गट निर्माण करून पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील मे. हंसा सिटी बस डेपोतील ११५ बसची पथकाने तपासणी केली. यात तीन बसेसमध्ये मोठ्या स्वरूपाचे तांत्रिक दोष आढळून आले. या बस डेपोतून न सोडता उर्वरित ११२ बसेस सकाळी १० च्या सुमारास डेपोतून सोडण्यात आल्या. पटवर्धन मैदानातील मे. आर. सिटी. बस डेपोतील ११६ बसेसची तपासणी केली असता, ९ बसेस नादुरूस्त आढळून आल्या. त्यामुळे १०७ बसेस डेपोतून सोडण्यात आल्या. तसेच खापरी येथील मे. ट्रॅव्हल्स टाइम्स बस डेपोतील ७८ बसेसची तपासणी केली असता एक बस नादुरुस्त आढळून आली.आकस्मिक तपासणीत अनेक बसेस नादुरुस्त आढळून आल्या. करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात ऑपरेटरवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी डिम्टस्ची आहे. असे असूनही संबंधित बस ऑपरटेरवर कारवाई होत नसेल तर डिम्टस् कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सभापतींनी दिली होती. अनियिमतता असूनही आजवर दंडात्मक कारवाई न केल्याने सभापतींनी ऑरेंज सिटी स्ट्रीट, पटवर्धन डेपो व खापरी डेपो ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाखांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. तसेच बस ऑपरेटरवर कारवाई न केल्याने डिम्टस् कंपनीवर २ लाखांचा दंड आकारण्याचे निर्देश बाल्या बोरकर यांनी परिवहन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक