दयानंद पाईकरावनागपूर : नागपूर रेड झोनमध्ये असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ग्रामीण भागात वाहतूक सुरु केली. त्यानुसार पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या अभावी महामंडळास फटका बसला. महामंडळाने एकूण १७ बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था सांभाळली. परंतु १७ बसेसच्या माध्यमातून ७८ फेऱ्या चालविल्यानंतर सुद्धा एका बसमध्ये केवळ एकच प्रवासी या प्रमाणे केवळ ७४ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. प्रवाशांची संख्या आगामी दिवसात वाढणार असल्याची अपेक्षा एसटीच्या नागपूर विभागाने व्यक्त केली आहे.लॉकडाऊनंतर एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने विभागात वाहतुकीची तयारी केली होती. परंतु गुरुवारी रात्री नागपूर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे समजल्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी केवळ ग्रामीण भागात वाहतूक सुरु केली. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात १७ बसेसच्या माध्यमातून वाहतूक करण्यात आली. या बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यात ७८ फेऱ्या चालविण्यात आल्या. परंतु बसेस चालवूनही महामंडळाला नुकसान सोसावे लागले. ७८ फेºयांच्या माध्यमातून केवळ ७४ प्रवासी मिळालेत. यामुळे पहिल्याच दिवशी महामंडळाला वाहतुकीच्या माध्यमातून नुकसान झाले.दोन दिवसात वाढतील प्रवासी‘पहिलाच दिवस असल्यामुळे बहुतांश ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेसच्या वेळा, फेऱ्यांबाबत माहिती नव्हती. त्यामुळे प्रवासी कमी मिळालेत. आगामी दोन दिवसात ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक वाढेल.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग