नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदला कळमना धान्य बाजारातील सर्व आडतिया आणि व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रतिष्ठान बंद केले व पूर्णपणे पाठिंबा दिला. मार्केट बंद असल्याने संपूर्ण कळमना धान्य बाजारात शांतता होती. याशिवाय भाजीपाला, फळ आणि अन्य सर्वच बाजारपेठा सुरू होत्या.
धान्य मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढून निषेध करण्यात आला. निषेध सभा बोलावून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आंदोलन करण्यात आले आणि केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण मार्केटमध्ये मिरवणूक काढून विरोध दर्शविण्यात आला.
आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळराव कळमकर, रामेश्वर हिरुळकर, सारंग वानखेडे, नरेश जिभकाटे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, राजेश सातपुते, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्माईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.