शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

लोकमतच्या नावाखाली व्यापाºयाला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:12 AM

लोकमतच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी उपराजधानीतील एका बिल्डींग मटेरियल व्यापाºयाला दोन लाखांचा गंडा घातला.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांचे कृत्य, नंदनवनमध्ये फसवणूक : दिल्ली, मुंबईचे कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी उपराजधानीतील एका बिल्डींग मटेरियल व्यापाºयाला दोन लाखांचा गंडा घातला. या खळबळजनक प्रकरणात सायबर गुन्हेगारांची आंतरराज्यीय टोळी सहभागी असावी, असा संशय असून, शुक्रवारी नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.नंदनवनमधील प्रमोद राऊत यांचे रमणा मारुती परिसरात दुकान आहे. २ नोव्हेंबरला दुपारी दोन ठगबाज त्यांच्या दुकानात आले. आम्ही ‘लोकमत’चे सर्व्हेअर आहोत, असे सांगून ४५० रुपयात एक वर्ष वृत्तपत्र लावल्यास रविवारी चार वेळा मोफत जाहिराती छापू आणि तुम्हाला उपहारदेखील मिळेल, असे ठगबाज म्हणाले.चांगली आॅफर असल्याचे पाहून राऊत यांनी ठगबाजांना लोकमत मीडिया प्रा. लि. च्या नावाने ४५० रुपयांचा अडीच महिन्यानंतरच्या तारखेचा धनादेश दिला. ठगबाजांनी त्यांना धनादेश मिळाल्याची लोकमतच्या नावाची बनावट पावती दिली. हा धनादेश बँकेत जमा करण्यापूर्वी कार्यालयातून शहानिशा केली जाईल, असेही ठगबाजांनी सांगितले.दोन दिवसानंतर राऊत यांच्या मोबाईलवर फोन आला. मी दिल्लीच्या गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक बोलतो. आम्ही एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याचा फोन ट्रॅप करतो आहे. मात्र, त्याचा नंबर लागण्याऐवजी तुमचाच वारंवार नंबर लागतो. त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. तुम्ही तुमचा मोबाईल काही दिवसांसाठी स्वीच्ड आॅफ करा, असे त्या व्यक्तीने सांगितले. हा मोबाईल नंबर अनेक ग्राहकांकडे आहे, त्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणत राऊत यांनी फोन बंद करण्यास असमर्थता दाखवली असता त्या आरोपीने त्यांना हा गुन्हेगार मोठा खतरनाक असून, तुम्ही हे करताना देशाच्या हिताचे काम करीत आहे, असे म्हटले. तुम्ही तात्काळ तुमचा मोबाईल स्वीच्ड आॅफ करा. न केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते, अशी धमकी दिली. त्यामुळे राऊत यांनी आपला मोबाईल बंद केला. दरम्यान, काही वेळेनंतर राऊत यांनी आपला मोबाईल पुन्हा सुरू केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज आले होते. त्यांच्या खात्यातून १ लाख, ९३ हजार, ८५८ रुपयांची खरेदी करण्यात आल्याचे ते मेसेज होते. त्यामुळे राऊत हादरले. त्यांनी सरळ बँकेत धाव घेतली. त्यानंतर फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.बनावट ओळखपत्रही बनविलेराऊत यांनी लोकमतच्या नावे दिलेल्या धनादेशावरची १ फेब्रुवारी २०१८ ची तारीख बेमालूमपणे बदलवून आरोपींनी त्यावर ९ नोव्हेंबर २०१७ ही तारीख लिहिली. त्यांनी जयपूरच्या जव्हेरी बाजारातील एका सराफाकडून दागिने खरेदी केले. यावेळी आरोपीने स्वत:चा परिचय प्रमोद राऊत असा दिला अन् बनावट ओळखपत्रही दाखवले. दागिन्याचे बिल देताना आरोपींनी ४५० रुपयांच्या रकमेऐवजी १ लाख, ९३ हजार, ८५८ रुपयांची रक्कम नमूद केली. प्रमोद राऊत आणि सराफा व्यापाºयाचे खाते एकाच बँकेत असल्यामुळे राऊत यांच्या खात्यातून रक्कम वळती होताच सराफाने त्या ठगबाजांना दागिने दिले. हा धक्कादायक घटनाक्रम बँक अधिकाºयांसोबत चर्चा केल्यानंतर राऊत यांच्या लक्षात आला.महिनाभरापूर्वी झाली होती विचारणात्यामुळे त्यांनी सर्वप्रथम बँक अधिकाºयांच्या मदतीने तो व्यवहार फ्रीज (स्थगित) केला. त्यानंतर ज्या नंबरच्या धनादेशावरून हा व्यवहार झाला, तो धनादेश आपण लोकमतच्या कथित सर्व्हेअरला दिल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शुक्रवारी नंदनवन ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या संबंधाने राऊत यांनी चर्चा करताना सुमारे दीड महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने त्यांच्या फोनवर संपर्क केला होता. साहित्याची आॅनलाईन खरेदी करायची आहे, असे सांगून बिल (पेमेंट) देण्यासाठी बँक खात्याची माहिती विचारली होती. एवढेच नव्हे तर बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबरही विचारला होता.