धनत्रयोदशीला सोने खरेदीची परंपरा : इलेक्ट्रॉनिक्स व कपडे खरेदीसाठी गर्दीनागपूर : धनत्रयोदशी धनाची पूजा करण्याचा दिवस; शिवाय या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. याचबरोबर सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी होणार आहे. नाण्यांसह दागिने खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता सर्वच सराफा व्यावसायिक सज्ज असून अनेकांनी शोरूमची सजावट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात फारशी वाढ न झाल्यामुळे या दिवशी ग्राहक खरेदीसाठी बाजारात येण्याची अपेक्षा आहे. दिवाळीत धनत्रयोदशीला सर्व बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. दुचाकी आणि चारचाकी वाहने घरी नेणारपूर्वीच बुकिंग केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने घरी नेण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभमुहूर्त आहे. खरेदी केलेली वाहने ग्राहक धनत्रयोदशीला घरी नेतील. कुटुंबीयांसह वाहने खरेदीची परंपरा असल्यामुळे या दिवशी शोरूमध्ये सकाळपासूनच गर्दी होणार आहे. जवळपास ३ हजार दुचाकी आणि ५०० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांच्या विक्रीची अपेक्षा आहे. वाहने खरेदीसाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी कमी व्याजदराच्या योजना दाखल केल्या आहेत. सर्व योजनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)
बाजारपेठांमध्ये होणार कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: October 28, 2016 2:35 AM