शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार : एमव्हीआर रविकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:37 AM

कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे होते. राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार असल्याचे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक एमव्हीआर रविकुमार यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे नागपूर सीए शाखेतर्फे बँक ब्रँच ऑडिटवर चर्चासत्र

लोकमत न्यूज  नेटवर्क  नागपूर : कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे होते. राष्ट्र उभारणीत सीए आणि बँकर्स भागीदार असल्याचे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक एमव्हीआर रविकुमार यांनी येथे व्यक्त केले.आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर शाखेच्यावतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. रविकुमार म्हणाले, अंतिम तिमाहीचे परिणाम आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाने आणलेल्या आर्थिक बदलांमुळे उत्साहवर्धक होते आणि अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने जात आहे. पुढील दिवस बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रासाठी खूप उज्ज्वल आहेत. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमुळे अनेक देश भारताकडे बघत आहेत.बँकर्सना त्यांचे मानसिक वय तरुण ठेवण्यासाठी सातत्याने शिकणे आवश्यक आहे. बँकांमध्ये ऑडिट कमिटी बोर्ड एक स्वतंत्र विभाग आहे, ज्याकडे बँकिंग व्यवस्थेत फसवणुकीचा तपास करण्यासाठी एक मजबूत आयटी प्रणाली आहे. बँकर्सला सीएंवर आणि जारी प्रमाणपत्रांवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर म्हणाले, सतत ज्ञान अद्ययावत करणे हे व्यावसायिक कौशल्य आहे. सदस्यांचे कौशल्य आणि ज्ञानवर्धन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते. प्रादेशिक परिषदेचे सदस्य सीए अभिजित केळकर यांनी लेखापरीक्षकांकडून अपेक्षा वाढत असल्याने, बँक ऑडिट करण्याच्या काळासाठी फॉरेन्सिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगितले.याप्रसंगी आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह, सीए जुल्फेश शाह, सीए राजेश खानझोडे, सीए श्रीनिवास जोशी, सीए नितांत त्रिलोकेकर, सीए गोकुल राठी, सीए अभिजित सांझगिरी, सीए श्रीनिवास, सीए अक्षय गुल्हाने, सीए किरिट कल्याणी, सीए संजय अग्रवाल, सीए हरीश रंगवानी, सीए सतीश सारडा, सीए स्वप्निल अग्रवाल, सीए जितेन सागलानी उपस्थित होते.

टॅग्स :chartered accountantसीएnagpurनागपूर