जगदीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी व खासगी बँकांना चुना लावणाऱ्या टोळीचे सूत्रधार सीए बंधू व त्यांच्या टोळीत सहभागी साथीदारांनी आतापर्यंत किमान १००० कोटी रुपयांचे कर्ज व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरसह अन्य शहरांमध्ये पसरलेल्या या टोळीची गंभीरतेने चौकशी केल्यास सरकारी अधिकारी व उद्योजकांसह अनेकांवर कारागृहात जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास एजन्सीकडून या प्रकरणाची चौकशी केल्यास सीए व त्यांच्या टोळीची माहिती पुढे येऊ शकते.नुकतेच गुन्हे शाखा पोलिसांनी देना बँकेशी फसवणूक झाल्याचे दोन प्रकरण नोंदविले आहे. यात सीएसह १८ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे कर्ज व सीसी लिमिट मिळवून बँकेला ५.५ कोटी रुपयांनी फसविले आहे. पोलिसांनी १९ प्रकरणांत १०० कोटीची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. त्यापैकी दोन प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) व बँकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात या टोळीत शहरातील सीए बंधूंची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे. सीएच्या मदतीने खासगी व सरकारी बँकेतून किमान एक हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, ते गेल्या १५ वर्षांपासून व्यवसायात आहेत. सरकारी व खासगी बँकेत त्यांनी आपली चांगली पत बनविली आहे. बँकेतून कर्ज घेऊन ते बुडविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या तोंडावर या सीए बंधूंचे नाव आहे.त्यांच्याकडे बँकेला बुडविणारेच ग्राहक येतात. त्यांच्या कामाची पद्धत पूर्णपणे व्यावसायिक आहे. ते १० ते २० टक्के कमिशन वसूल करतात. त्या मोबदल्यात कागदपत्र बनविणे, प्रस्ताव तयार करणे, मंजुरी मिळविणे आदी कामे करवून देतात. त्यांच्या इशाºयावर बँकेचे अधिकारीसुद्धा काम करतात. खानापूर्तीसाठी कर्जाची कागदपत्रे व गहाण संपत्तीची चौकशी केली जाते. बँक अधिकारी कमी वेळात कर्ज उपलब्ध करून देतात. बँकेद्वारे कर्ज मिळताच, सीए बंधूंना त्यांचे कमिशन ग्राहकाकडून प्राप्त होते. ठरलेल्या योजनेनुसार कर्जाचे तीन हप्ते न भरल्यास संबंधित खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स) होऊन जाते. त्यानंतर बँक अधिकारी ग्राहकावर कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकतात. सीए बंधू पुन्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी साठगाठ करून, मूळ कर्जाच्या रकमेच्या ४० ते ५० टक्के रक्कम परत करण्यासाठी तडजोड करतात. या तडजोडीचे कमिशनसुद्धा १० ते २० टक्के असते.अशा पद्धतीने कर्ज देणे व तडजोड करीत असल्याने सीए बंधू व त्यांचे सहकारी मालामाल झाले आहेत. बोगस कागदपत्रे व आपल्या संपर्काचा वापर करून त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षात व्यापाऱ्यांना किमान एक हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.सीए बंधूंचे ग्राहक नेहमीच डिफॉल्टर होत असल्याने संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी सीएकडून आलेल्या प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले. याची माहिती सीए बंधूंना मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सीएकडून बँकेत कर्जाचे प्रस्ताव पाठविले होते. त्यांनी चार-पाच सीएना सोबत घेतले होते.रोख घेतले गेले कमिशनसीए बंधू व त्यांचे सहकारी कमिशनची रक्कम रोख घेत होते. सूत्रांची माहिती आहे की, कर्जधारकांना रक्कम आवंटीत झाल्यानंतर ते तत्काळ बँकेतून रोख काढत होते. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केल्यास सीए बंधूंची पोलखोल होणार आहे. त्यांच्या फसवेगिरीची संपूर्ण माहिती कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना माहीत आहे. एक कर्मचारी त्यांचा सहायक आहे तर दुसरा ग्राहकांकडून कमिशन वसूल करून, त्याला योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो.
देना बँकेतील गोलमालाचे सीए कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:41 AM
सरकारी व खासगी बँकांना चुना लावणाऱ्या टोळीचे सूत्रधार सीए बंधू व त्यांच्या टोळीत सहभागी साथीदारांनी आतापर्यंत किमान १००० कोटी रुपयांचे कर्ज व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देबोगस कागदपत्रांचा वापर सीए बंधूंनी व्यापाऱ्यांना मिळवून दिले १००० कोटींचे कर्ज