मोरेश्वर मानापुरे , नागपूर : सीए हे अर्थव्यवस्थेचा कणा, सुरक्षेचे भागीदार आणि आर्थिक गुन्हे रोखणारे संरक्षक असल्याचे मत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघटल यांनी येथे केले.आयसीएआयच्या नागपूर सीए शाखेतर्फे नवीन पात्र सीएंसोबत संवाद सत्राचे आयोजन चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स येथे करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून सिंघल यांनी नवीन सीएंचे अभिनंदन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए जयदीप शहा आणि नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने उपस्थित होते.
सिंघल म्हणाले, सीए हा नैतिक व्यवसाय आहे. ते राष्ट्रीय उभारणीचे भागीदार असून सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये सेतूचे काम करतात. कोर्स पूर्ण करण्यासाठी खूप संयम आणि चिकाटी आवश्यक आहे. एकदा पात्र झाला तर आकाशही मर्यादा नसते. जयदीप शहा म्हणाले, सीएंनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कौशल्य आणि ज्ञान अद्ययावत करत राहावे.
सीए अक्षय गुल्हाणे म्हणाले, यशाचा आनंद साजरा करताना आई-वडिलांचा त्याग विसरू नये. त्यांनी सर्व नवीन पात्र चार्टर्ड अकाउंटंट्सचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सतत ज्ञान अद्ययावत करण्यासाठी संस्थेच्या भविष्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा दिली. प्रादेशिक परिषद सदस्य सीए अभिजीत केळकर यांनी आता खरी शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि नवीन पात्र सदस्यांसमोर मोठी आव्हाने आहेत. या प्रसंगी ज्येष्ठ सीए अनिरुद्ध शेणवई, सीए गिरीश वझलवार, सीए सुधीर सुराणा, सीए अश्विनी एस अग्रवाल, सीए राजेश अग्रवाल, सीए चारुदत्त मराठे, सीए रमेश शहा, सीए नारायण डेंबले, सीए हेमंत लोढा उपस्थित होते.
संचालन उपाध्यक्ष सीए दिनेश राठी यांनी केले. शाखा सचिव सीए स्वरूपा वझलवार यांनी आभार मानले. कोषाध्यक्ष सीए दीपक जेठवानी, डब्ल्यूआयसीएएसए अध्यक्ष सीए तृप्ती भट्टड, माजी अध्यक्ष सीए संजय एम. अग्रवाल, सीए जितेन जितेंद्र सागलानी, नवीन पात्र सीए आणि त्यांचे पालक उपस्थित होते.