शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

केबल व्यावसायिकाचा खून

By admin | Published: January 08, 2015 1:17 AM

कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात जरीपटका परिसरातील एका केबल व डीजे व्यावसायिकाचा त्याच्याच साळ्याने खून केला. ही घटना मंगळवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मेकोसाबाग येथे घडली.

कौटुंबिक वाद : साळ्याने जावयास संपविले नागपूर : कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात जरीपटका परिसरातील एका केबल व डीजे व्यावसायिकाचा त्याच्याच साळ्याने खून केला. ही घटना मंगळवारी १०.४५ वाजताच्या सुमारास मेकोसाबाग येथे घडली. मुकेश जोगिंदर सिंह (३८) रा. आकार बिल्डिंग बैरामजी टाऊन असे मृताचे नाव आहे. तर पहलाज ऊर्फ कालू सुरेश सादीचा (२४) रा. मेकोसाबाग सिंधी कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार बैरामजी टाऊन येथील मुकेश सिंह याने २००५ साली कालूची बहीण सोनिया हिच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर मुकेश सोनियाला लहान-सहान गोष्टीसाठी मारहाण करू लागला. तो डीजे व केबलचा व्यवसाय करीत होता. या व्यवसायात त्याच्यासोबत साळा पहलाज ऊर्फ कालू सुद्धा काम करीत होता. मुकेशच्या सततच्या त्रासाला कंटाळून कालूची बहीण सोनिया ही आपल्या माहेरी मेकोसाबाग येथेच राहायला आली. मुकेश सिंहने तिला अनेकदा घरी नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती सासरी परतली नाही. मंगळवारी ६ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास मुकेश आपल्या सासरी तलवार घेऊन गेला. सोनियाच्या आई-वडिलांशी भांडण करीत तो सोनियाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. वाद वाढताना पाहून मुकेशचा साळा कालूने मध्यस्ती केली. कालू मध्ये पडताच मुकेशने सोनियाला सोडले आणि तो कालूशी भिडला. तो त्याला केबल-डीजेच्या व्यवसायातील १० लाखरुपये परत मागू लागला. यावरून दोघांमध्येच भांडण झाले. मुकेश कालूला मारहाण करू लागला. स्वत:ला सोडवत कालू घराबाहेर निघाला. अंगणातील चुलीजवळ जळावू लाकूड ठेवले होते. कालूने त्यातील एक लाकूड उचलले आणि मुकेशच्या डोक्यावर प्रहार केला. यात मुकेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हारगुडे सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले. मृत मुकेशची पत्नी सोनियाच्या तक्रारीनुसार आरोपी कालूच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जावई-साळ्यात अनेकदा झाला होता वाद मृत मुकेश सिंह आणि त्याचा साळा कालू यांच्यात अनेकदा वाद झाले होते. या वादामुळेच कालूने आपल्या जावयासोबत केबल व डीजेचा व्यवसाय बंद केला. यावरूनही त्यांच्यात राग होता.