लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी जैवविविधता पार्क वनक्षेत्र परिसरात आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे (ट्रॅपिंग केज) लावले जात आहेत. यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि इतर अभयारण्य क्षेत्रातूनही पिंजरे मागवण्यात आले आहेत. दरम्यान शनिवारी आणि रविवारी परिसरातील कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याची माहिती नाही.बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वनक्षेत्रात सातत्याने गस्त घातली जात आहे. काही गवताळ मैदानी भागात शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदतसुद्धा घेतली जात आहे. वाडी परिसरात बिबट्याने एका डुकराची शिकार केल्याचे परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आढळून आले होते. तेव्हापासून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मिहानचा वाघ तेल्हाºयातमिहान परिसरातील वाघ शनिवारी टाकळघाट आणि कान्होलीबारा मार्ग ओलांडून बोर अभयारण्याच्या दिशेने निघाला होता. त्यामुळे वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची योजना थांबवण्यात आली आहे. परंतु रविवारी पुन्हा एकदा वाघ तेल्हारा तलावाजवळ दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वन अधिकारी संबंधित परिसरात त्याचा शोध घेत आहेत.
नागपुरात बिबट्याला पकडण्यासाठी लावले जाताहेत पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 11:16 AM