सम्यक थिएटर महाचर्चा : न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे आवाहननागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे देशातील दलित-आदिवासींसह एकूणच समाजाची प्रगती साधायची असेल तर आरएसएसविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन लढा पुकारा, असे आवाहन निवृत्त न्यायमूर्ती व ज्येष्ठ विचारवंत न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक थिएटर नागपूरतर्फे सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात ‘आंबेडकरी समाजाचे रथचक्र कुठे अडले?’ या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती. मुख्य वक्ते म्हणून न्या. कोळसे पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे अध्यक्षस्थानी होते. न्या. कोळसे पाटील म्हणाले, भारताचे संविधान हे सर्व धर्मग्रंथांचा बाप आहे. आरएसएस देशाचे संविधान मानत नाही. सध्या त्यांची सत्ता आहे. केंद्र सरकारचे सर्व कार्यक्रम हे संविधानविरोधी आहेत. देशात होणारे बॉम्बस्फोट व दंगलीमध्येसुद्धा त्यांचा हात आहे. याबाबतचे सर्व पुरावे आहेत. परंतु सर्व यंत्रणा त्यांचीच असल्याने या गोष्टी उघडकीस येत नाहीत; इतकेच नव्हे तर भारतातील गुप्तचर संस्था आयबी ही सुद्धा आरएसएसची शाखा असल्याचेही त्यांनी सांगितले. या देशात आंबेडकरवादीच क्रांती घडवून आणून शकतात, कारण ते विचाराने तयार आहेत. परंतु स्वार्थामुळे बरबटलेसुद्धा आहेत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. यशवंत मनोहर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैश्विक तत्त्वज्ञान आता जगभरात मांडले जात असल्याचे स्पष्ट केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले. नरेश साखरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी आहे - राजा आकाश जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा. व्यक्ती हा आपल्या चुकांमधून शिकत असतो. त्यामुळे प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते. आयुष्यात प्रगती करण्यासाठी कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. परिश्रम करावेच लागेल. करिअरमध्ये शॉर्टकट हा विध्वंसाकडे नेतो, असे प्रा. राजा आकाश यांनी सांगितले. करिअर गायडन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत होते.
आरएसएसविरुद्ध लढा पुकारा
By admin | Published: April 18, 2017 1:51 AM