‘लॉग टर्म मॉनिटरींग’ योजना : अभ्यासासाठी राज्यात पहिला प्रयोगचंद्रपूर : वाघांचा अभ्यास तसेच त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांना ‘कॉलर आयडी’ लावण्यात आले आहे. कॉलर आयडी सेटेलाईटने जोडलेला असून वाघाचे लोकेशन तसेच त्याच्या हालचालींची माहिती मिळणार आहे. ‘लॉग टर्म मॉनिटरिंग’ योजने अंतर्गत ताडोबातील एक वाघ व एक वाघीनीला कॉलर आयडी लावण्यात आले आहे. वाघांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गणपती पी. गरड यांनी दिली. या योजने अंतर्गत १७ आॅक्टोबरला ताडोबा क्षेत्रातील जामणी येथे एका वाघाला तर १९ आॅक्टोबरला तलांडा कम्पार्टमेंट क्रमांक ९० मध्ये एक वाघीनीला कॉलर आयडी लावण्यात आले. कॉलर आयडी लावण्या अगोदर वाघावर निगरानी ठेवून इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर कॉलर आयडी लावण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
ताडोबातील वाघांना ‘कॉलर आयडी’
By admin | Published: October 21, 2014 12:54 AM