लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नितमहाविद्यालयातील अभ्यास ठप्प पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे हिवाळी परीक्षांवर प्रभाव पडू शकतो का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठ प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कुठलीही पावले उचललेली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमफुक्टो’ने पाच प्रमुख मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. यात शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात याव्या, यांचा समावेश होता. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. त्यामुळे महाविद्यालय व शैक्षणिक विभागांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर अशात कामबंद आंदोलन झाले तर त्याचा परिणाम अध्यापन कार्यावर होईल.काही शिक्षकांकडून बंदचा विरोधदरम्यान, ‘एमफुक्टो’कडून पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनाविरोधात काही शिक्षकांनी विरोधी भूमिका घेतली आहे. अशाप्रकारचे आंदोलन हे बेकायदेशीर आहे. या आंदोलनाच्या बहाण्याने शिक्षक आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहेत, असे मत नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केले. यासंबंधात त्यांनी राज्य शासनालादेखील पत्र लिहिले आहे.शिक्षण मंच सहभागी होणार नाहीविद्यापीठ शिक्षण मंच या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी स्पष्ट केले आहे. हे आंदोलनच चुकीचे आहे. ‘एमफुक्टो’चे पदाधिकारी चुकीची माहिती देऊन शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन विद्यार्थीहिताच्या विरोधात आहे, असेदेखील त्या म्हणाल्या.
नागपूर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:16 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नितमहाविद्यालयातील अभ्यास ठप्प पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे हिवाळी परीक्षांवर प्रभाव पडू शकतो का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. ...
ठळक मुद्दे२५ सप्टेंबरपासून बसणार फटका : हिवाळी परीक्षेवर पडू शकतो प्रभाव